शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

CoronaVirus: भारतावर कोरोना संकट, परदेशी माध्यमांत पंतप्रधान मोदींवर प्रचंड टीका!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 4:39 PM

कोरोना व्हायरसपुढे देशातील आरोग्य व्यवस्था हतबल होत असल्याचे चित्र आहे. रुग्णालये आणि स्मशानांतही वेळेवर जागा मिळणे कठीण झाले आहे. पार्किंग एरियामध्येही मृतदेह जाळताना दिसत आहेत.

नवी दिल्ली - भारतातील कोरोना स्थितीत अद्यापही सुधारणा होताना दिसत नाही. केंद्री आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात तब्बल 4,01,993 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 3523 जणांचा मृत्यू झाला आहे. याच बरोबर देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या  2,11,853 लाखवर पोहोचली आहे. सध्या देशात 32,68,710 सक्रिय रुग्ण आहेत. (Corona Virus crisis in India, huge criticism of Prime Minister Modi in foreign media)

कोरोना व्हायरसपुढे देशातील आरोग्य व्यवस्था हतबल होत असल्याचे चित्र आहे. रुग्णालये आणि स्मशानांतही वेळेवर जागा मिळणे कठीण झाले आहे. पार्किंग एरियामध्येही मृतदेह जाळताना दिसत आहेत. सामूहिक अंत्यसंस्कारांचे फोटोही आंतरराष्ट्रीय माध्यमांत पसरताना दिसत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांत कोरोना संकटामुळे बिघडणाऱ्या परिस्थितीवरून सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

CoronaVirus : ...तर भारतातून 'या' देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास, अमेरिकेत जाणाऱ्यांसाठीही नवे निर्बंध!

आंतरराष्ट्रीय माध्यमांत भारतातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. कोरोना संकटाच्या काळात निवडणूक सभा आणि कुंभ मेळा आयोजन करण्याचा निर्णय चुकीचा होता, असे या माध्यमांत म्हणण्यात आले आहे. सर्वात नवे वृत्त अमेरिकेतील टाइम मॅक्झिनमध्ये “How Modi Failed Us” शीर्षकाखाली प्रसिद्ध झाली आहे. ते भारतीय पत्रकार राणा अयूब यांनी लिहिले आहे. भारतातील मजबूत सरकारने गोष्टींकडे दूर्लक्ष केले, असेही यात म्हणण्यात आले आहे.

टाइम मॅक्झिनच्या वृत्तात, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या तयारीत कमतरतेसाठी सरकारला जबाबदार धरण्यात आले आहे. या वृत्तात म्हणण्यात आले आहे, की पंतप्रधानांनी कुंभ मेळा 'सांकेतिक' पद्धतीने करा, असे आवाहन करण्यास उशीर केला. तसेच, उपचारांअभावी हजारो लोकांना जीव गमवावा लागला. मात्र, देशातील मोठे नेते निवडणूक प्रचारात व्यस्त होते.

Corona Virus : कोरोना संकटात भारताच्या 'या' जिगरी मित्रानं पाठवली मदत, दोन विमानं दिल्लीत दाखल

द टाइम मॅक्झिनप्रमाणेच अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्स आणि इग्लंडमधील न्यूजपेपर द गार्डियननेही वृत्त प्रसिद्ध केले आहे. न्यूयॉर्क टाइम्सने “As Covid 19 Devastates India, Deaths Go Undercounted” या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. जेव्हा कोरोनाने भारतात थैमान घातले होता, तेव्हा मृत्यूची संख्या कमी सांगितली जात होती. आकड्यात हेराफेरी केली जात आहे, असे या वृत्तात म्हणण्यात आले आहे.

'द ऑस्ट्रेलियन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात म्हणण्यात आले आहे, की अहंकार, अती राष्ट्रवाद आणि नोकरशाहीच्या अयोग्यतेने भारतात कसे कोरोना संकट वाढले. यातच गर्दी आणि गर्दीत राहणे पसंत करणारे पंतप्रधान आपल्यातच व्यस्त राहिले आणि नागरिक गुदमरत राहिले. 'द ऑस्ट्रेलियन' मध्ये प्रसिद्ध झालेल्या या वृत्तासंदर्भात कॅनबरा येथील भारतीय दुतावासाने तीव्र आक्षेपही व्यक्त केला होता.

CoronaVirus: कोरोनावर बड्या-बड्या देशांना जमला नाही, असा करिश्मा छोट्याशा भूटाननं करून दाखवला; बघा, कसा?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीMediaमाध्यमे