शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: एकूण 4 टप्पे! भारतात कोणत्या टप्प्यात आहे 'कोरोना'?, जाणून घ्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 09:31 IST

Coronavirus: कोरोनामुळे आतापर्यंत 7000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 140 पर्यंत पोहोचली आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे आतापर्यंत 7000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.भारतातील रुग्णांची संख्या 140 पर्यंत पोहोचली आहे. भारतात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

नवी दिल्ली - चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 7000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 140 पर्यंत पोहोचली आहे. कोरोनामुळे भारतात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी (18 जानेवारी) सकाळी पुण्यात कोरोना व्हायरसचा एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा 42 झाला आहे. देशातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे मात्र सरकारी यंत्रणांनी वेळेत पावले उचलल्यामुळेच अन्य देशांप्रमाणे भारतात रुग्ण वाढले नाहीत. 

चीन, इटली, अमेरिका, इराण, स्पेन आदी देशांत कोरोनाचा कहर सुरू असताना भारतातील परिस्थिती मात्र बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. त्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही समाधान व्यक्त केले आहे. देशात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. दिल्लीपासून केरळपर्यंत पसरलेल्या या रोगानं पश्चिम  बंगालमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोलकात्यात कोरोना संक्रमित पहिला रुग्ण आढळला आहे. कोरोनाचे एकूण चार टप्पे आहेत. हे टप्पे कोणते आणि भारताता कोणत्या टप्प्यात आहे हे जाणून घेऊया. 

पहिला टप्पा  

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर हा व्हायरस वेगाने जगभरात पसरत आहे. कोराना व्हायरस संक्रमित असलेल्या देशामध्ये वास्तव्य असल्यास कोरोनाची लागण होण्याची शक्यता ही अधिक असते. तसेच त्याचा संसर्ग झाल्यास इतरांना देखील तो होण्याचा धोका हा अधिक आहे. भारतात कोरोना व्हायरस हा बाहेरून आला आहे. पहिल्या टप्प्यात हा व्हायरस एखाद्या ठिकाणी शिरकाव करतो. 

दुसरा टप्पा

सध्या भारतात दुसऱ्या टप्प्यात कोरोना आहे. म्हणजेच कोरोना व्हायरस संक्रमित असलेल्या देशातून ज्या व्यक्ती भारतात आल्या आहेत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर अनेकांना त्याचा संसर्ग होतो. सध्या भारतात बाहेरून आलेल्या लोकांना कोरोना झाला आहे. मात्र याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. 

तिसरा टप्पा

तिसऱ्या टप्प्यात कोरोना हा देशात असलेल्या व्यक्तींमुळे पसरतो. म्हणजेच स्थानिक व्यक्तींकडून जेव्हा हा आजार दुसऱ्या व्यक्तींना होण्यास सुरुवात होते. भारतात सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. मात्र संसर्ग झालेल्यांचा आकडा सातत्याने वाढत राहीला तर तो तिसऱ्या टप्प्यात जाईल आणि त्यासोबतच नियंत्रण मिळवण कठीण होईल. तिसऱ्या टप्प्यात सरकारला मॉल, दुकाने, शाळा आणि गर्दीची ठिकाणे सक्तीने बंद करावी लागतात. 

चौथा टप्पा 

सध्या अनेक देशांमध्ये कोरोना हा वेगाने पसरला असून मृतांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. त्या देशात कोरोना चौथ्या टप्प्यात आहे. जेव्हा व्हायरस हा अत्यंत वेगाने देशात भौगोलिकरित्या पसरतो. तेव्हा तो चौथ्या टप्प्यात पोहोचतो. चीन, इटली, इराण आणि स्पेनमध्ये कोरोना व्हायरस हा चौथ्या टप्प्यात आहे. 

कोलकात्यात कोरोना संक्रमित पहिला रुग्ण आढळला आहे. त्याशिवाय भारतीय लष्करातील एक जवानही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदर्शनास आलं आहे. कोलकात्यात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला असून, तो रुग्ण लंडनवरून परतला आहे. रुग्णाला बालीघाटमधल्या आयडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोना व्हायरसचं हे पहिलंच प्रकरण आहे. ब्रिटनवरून परतलेला हा रुग्ण कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्या रुग्णाचे आई-वडील आणि त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. 18 वर्षांचा हा तरुण 15 मार्च रोजी ब्रिटनवरून परतला होता. आता त्या तरुणासह आई-वडील आणि चालकाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 42वर, पुण्यात आढळला आणखी एक रुग्ण 

Coronavirus: सामान्यांचं सोडा; संसदेलाच मिळेनात सॅनिटायझर आणि मास्क

Coronavirus : कोरोनानं लष्करातील जवानही संक्रमित; देशातील रुग्णांची संख्या 140वर

MP Crisis: ‘माझ्या हातात बॉम्ब नाही, पिस्तूल नाही आणि शस्त्रे नाहीत तरीही पोलिसांनी रोखलं’

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतchinaचीनMaharashtraमहाराष्ट्र