सप्टेंबरपासून सुरू होणार Zydus च्या लसीचा पुरवठा; MD शर्विल पटेल यांनी दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 05:26 PM2021-08-21T17:26:07+5:302021-08-21T17:26:38+5:30

पटेल म्हणाले, सरकारला लसींचा पुरवठा केला जाईल. यानंतर मुलांच्या लसीकरणाची योजना कशी असेल, याचा निर्णय सरकारवर अवलंबून राहील.

Corona virus corona vaccine zycov-d vaccine supply to start in september says md dr sharvil patel | सप्टेंबरपासून सुरू होणार Zydus च्या लसीचा पुरवठा; MD शर्विल पटेल यांनी दिली महत्वाची माहिती

सप्टेंबरपासून सुरू होणार Zydus च्या लसीचा पुरवठा; MD शर्विल पटेल यांनी दिली महत्वाची माहिती

Next

नवी दिल्ली - झायडस कॅडिलाने मुलांसाठी तयार केलेल्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापराची मंजुरी मिळाली आहे. यानंतर, आज झायडस ग्रुपचे एमडी डॉ. शर्विल पटेल यांनी ZyCOV-D चा पुरवठा आणि किंमत यांसंदर्भात अनेक महत्वाच्या गोष्टींवर भाष्य केले. सध्या आम्ही लसींचे उत्पादन कमी प्रमाणावर करत आहोत. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत लसीच्या पुरवठ्याला सुरुवात होईल, अशी आशा आहे. तसेच, ऑक्टोबरपर्यंत आमच्याकडे एका महिन्यात 10 कोटी लसी तयार करण्याची क्षमता असेल, असे पटेल यांनी म्हटले आहे. (Corona virus zycov-d vaccine supply to start in september says md dr sharvil patel)

पटेल म्हणाले, सरकारला लसींचा पुरवठा केला जाईल. यानंतर मुलांच्या लसीकरणाची योजना कशी असेल, याचा निर्णय सरकारवर अवलंबून राहील. मुलांना या लसीचे एकूण तीन डोस दिले जातील आणि डोस सेमच राहतील. आम्ही अर्जदारांचा ओपनिंग स्टॉक सुरक्षित केला आहे. यूएसनेही लसीची मागणी केली आहे. मुलांसाठीची ही भारतातील पहिलीच लस आहे. 

तुम्ही घेताय ती लस अस्सल आहे ना?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, ही लस सुई मुक्त असणार आहे. आणि हिच्यासाठी सुरक्षा अॅपचा वापर केला जाईल. लॅन्सेटच्या जरनलमध्ये या लसीचा पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील रिझल्ट पब्लिश करण्यात आला आहे. साइड इफेक्टच्या दृष्टीने कुठल्याही विषयावर बंदी घातलेली नाही. दुसऱ्या डोसनंतर गंभीर संक्रमणामुळे मृत्यू झाल्याचे दिसून आलेले नाही. याच बरोबर, 50 हून अधिक क्लिनिकल साइट्समध्ये अध्ययन करण्यात आले आहे. ही लस 25 डिग्री तापमानावर तीन महिने स्टोर केली जाऊ शकते. 

दरवर्षी 10 ते 12 कोटी लसी तयार करण्याचा प्लॅन -
पटेल म्हणाले, कंपनी दरवर्षी 10 ते 12 कोटी डोस तयार करण्याचा प्लॅन करत आहे. नवे प्लांट पूर्णपणे काम करत आहेत. ही लस निडल फ्री असेल आणि जगातील अशी पहिलीच लस असेल. या लसीच्या अभ्यासात 1400 किशोरवयीन मुलांचा समावेश करण्यात आला होता. या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 28 दिवसांनी आणि तिसरा डोस 56 दिवसांनी घ्यावा लागेल. याच बरोबर या लसीमुळे ट्रिपॅनोफोबिया म्हणजेच सुई आणि रक्ताची भीतीही असणार नाही. संपूर्ण लसीकरण कार्यक्रम दोन महिन्यांत पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. 

‘स्पुतनिक लाइट’, एकच डोस पुरून उरणार

दुसऱ्या लसीवरही काम सुरू -
पटेल म्हणाले, आम्ही दोन डोस वाल्या लसीवरही काम करत आहोत. लसीच्या किंमतीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, एका महिन्यात लसीची किंमत निश्चित केली जाईल. लसीचा सर्वाधिक भाग सरकारला दिला जाईल. सरकारसोबत लसीची किंमत आणि मात्रा यासंदर्भात चर्चा होणे अद्याप बाकी आहे. महिनाभरात यासंदर्भातील चित्र अधिक स्पष्ट होईल.

Web Title: Corona virus corona vaccine zycov-d vaccine supply to start in september says md dr sharvil patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.