शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:09 IST

Corona Virus : देशात कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. गेल्या ५ दिवसांत कोविडचे १७०० रुग्ण आढळले असून आता एकूण रुग्णांची संख्या २७०० च्या पुढे गेली आहे.

देशात कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. गेल्या ५ दिवसांत कोविडचे १७०० रुग्ण आढळले असून आता एकूण रुग्णांची संख्या २७०० च्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ३० मे पर्यंत देशभरात २७१० रुग्णांची नोंद झाली आहे. या आधीच्या आठवड्यात ७५२ रुग्णांची नोंद झाली होती. रुग्णांची संख्या सातत्याने वेगाने वाढत आहे.

आंध्र प्रदेशात १६, अरुणाचल प्रदेशात ३, आसाममध्ये २, चंदीगडमध्ये १, छत्तीसगडमध्ये ३, दिल्लीत २९४, गोव्यात ७, गुजरातमध्ये २२३, हरियाणामध्ये २०, जम्मू आणि काश्मीरमध्ये ४, कर्नाटकात १४८, केरळमध्ये ११४७, मध्य प्रदेशात १०, महाराष्ट्रात ४२४, मिझोराममध्ये २, ओडिशामध्ये ५, पुद्दुचेरीमध्ये ३५, पंजाबमध्ये ४, राजस्थानमध्ये ५१, तामिळनाडूमध्ये १४८, तेलंगणात ३, उत्तराखंडमध्ये २, उत्तर प्रदेशात ४२ आणि पश्चिम बंगालमध्ये ११६ रुग्ण आढळले आहेत. दिल्लीतही एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

"कोरोनासोबत जगण्याची सवय लावा, २१-२८ दिवस...”; नव्या व्हेरिएंटबद्दल काय म्हणाले तज्ज्ञ?

कोणत्या राज्यांमध्ये वाढतेय रुग्णांची संख्या?

केरळ (+३५५), महाराष्ट्र (+१५३) आणि दिल्ली (+२४) यासह अनेक राज्यांमध्ये एक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. याशिवाय महाराष्ट्र (+४) आणि कर्नाटक (+१) यासह काही ठिकाणी मृतांची संख्याही वाढली आहे. अनेक राज्यांमध्ये कोणतेही नवीन रुग्ण किंवा मृत्यूची नोंद झालेली नाही. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक ८,२९,८४९ आहे, केरळमध्ये ६,८४,९२७ आणि आंध्र प्रदेशात २,३२,६३५ आहे.

कोरोना लहान मुलांवर करतोय ॲटॅक; संसर्ग झाल्यास अशी घ्या खबरदारी, करू नका 'या' चुका

कोरोनाचा कहर! अमेरिकेत नवा व्हेरिएंट, भारतात वाढले रुग्ण; हाँगकाँग-तैवानमध्ये परिस्थिती गंभीर

कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू?

कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत जास्तीत जास्त मृत्यू महाराष्ट्र (१,४८,६०६), तामिळनाडू (३८,०८६) आणि कर्नाटक (४०,४१२). १९ मे नंतर देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना व्हायरसचे नवीन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश (४), छत्तीसगड (१), गोवा (१), गुजरात (७६), हरियाणा (८), कर्नाटक (३४), मध्य प्रदेश (२), राजस्थान (११), तामिळनाडू (३) आणि तेलंगणा (१) यांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत