शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Corona virus : कोरोनाचा नवीन AY.12 व्हेरिएंट? शास्त्रज्ञांची चिंता वाढली 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 9:11 AM

Corona virus : जीनोम सीक्वेंसिंगवर लक्ष ठेवणाऱ्या इन्साकॉगने सर्व प्रयोगशाळांसाठी अलर्टही जारी केले आहेत.

नवी दिल्ली : कोरोना व्हायसरचा आता नवीन AY.12 व्हेरिएंट समोर आला आहे. याआधी शास्त्रज्ञ AY.12 ला डेल्टा व्हेरिएंटचा भाग असल्याचे मानत होते. मात्र, AY.12 च्या सक्रियतेमुळे शास्त्रज्ञांना त्याचे स्वतंत्रपणे वर्गीकरण करावे लागले आहे. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे.

कोरोना व्हायरसमुळे संक्रमित झालेल्या नमुन्यांच्या जीनोम सीक्वेंसिंगदरम्यान AY.12 म्यूटेशनवर अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचे देशभरातील प्रयोगशाळांना सांगण्यात आले आहे. जीनोम सीक्वेंसिंगवर लक्ष ठेवणाऱ्या इन्साकॉगने सर्व प्रयोगशाळांसाठी अलर्टही जारी केले आहेत.

इन्साकॉगच्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या नवीन AY.12 व्हेरिएंटबद्दल फारशी माहिती देखील नाही. या म्यूटेशनचा किती परिणाम होत आहे? हे येत्या काही दिवसांत कळेल, पण आतापर्यंत जगभरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये 13 म्यूटेशन झाल्याचे उघड झाले आहे, त्यापैकी हा एक आहे आणि भारतातही AY.12 ची प्रकरणे समोर येत आहेत.

AY.12 अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहेइन्साकॉगच्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने सांगितले की, AY.12 म्यूटेशनचा अभ्यास अद्याप सुरू आहे. त्याबद्दल फारशी माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावरही उपलब्ध नाही. मात्र, असे आढळले आहे की जगभरातील 33 हजारहून अधिक नमुन्यांची पुष्टी झाली आहे, जी इतर डेल्टाच्या म्यूटेशनच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

याचबरोबर, ते म्हणाले की, AY.12 हा डेल्टाचा एक उप-वंश आहे, जो आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. परंतु त्याच्या संख्येची बारकाईने तपासणी करणे आवश्यक आहे. डेल्टा आणि AY.12 यांच्यातील परिणामांमध्ये काय फरक आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. आता एवढेच म्हणता येईल की हे दोन्हीही एकसारखे दिसत आहेत.

61.2 टक्के कोरोनाचे गंभीर व्हेरिएंटदेशात गेल्या 23 ऑगस्टपर्यंत 78865 नमुन्यांची जीनोम सीक्वेंसिंग झाला आहे. ज्यामध्ये 31,124 म्हणजेच 61.2 टक्के नमुने कोरोना व्हायरसचे गंभीर व्हेरिएंट मिळाले आहेत. डेल्टा व्हेरिएंटचे सर्वाधिक 21192 नमुने सापडले आहेत. म्हणजे अल्फा, बीटा आणि गॅमा सह इतर व्हेरिएंटपेक्षा भारतात डेल्टा कितीतरी पटीने जास्त आहे, ज्यामुळे लोक एकापेक्षा जास्त वेळा संक्रमित होऊ शकतात. लसीकरणानंतर ही संक्रमित होऊ शकतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या