शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
4
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
5
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
6
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
7
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
8
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
9
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
10
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
11
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
12
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
13
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
14
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
15
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
16
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
18
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
19
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
20
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus:...तर 'अशा' कर्मचाऱ्यांना घरातून काम करु द्या; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 11:25 IST

Corona Virus: जर कोणत्याही कर्मचाऱ्यामध्ये आजाराची लक्षणे आढळली तर त्याला घरातूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे.

ठळक मुद्देआजाराची लक्षणं आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी द्या कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे कर्नाटक सरकारचा निर्णयगूगल, मायक्रोसॉफ्ट, सिस्को कंपन्यांनी दिली मोफत सेवा

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचं संकट टाळण्यासाठी जगातील सर्व देशांनी वेगवेगळ्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोक कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकल्याची माहिती आहे. ३ हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. फेसबुक, ट्विटर आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सूचना केली आहे. 

कर्नाटक सरकारने कर्मचार्‍यांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आहे. कर्नाटक सरकारने बेंगळूरमधील सर्व कंपन्यांना सूचना केली आहे. जर कोणत्याही कर्मचाऱ्यामध्ये आजाराची लक्षणे आढळली तर त्याला घरातूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच लोकांना स्वच्छता ठेवण्यास सांगितले जात आहे कर्नाटक सरकारने यासाठी परिपत्रक जारी केला आहे. 

चीनच्या वुहान शहरापासून कोरोना व्हायरसची सुरुवात झाली, सध्या हा व्हायरस अमेरिका, युरोप, भारत, दक्षिण कोरिया आणि इतर अनेक देशांत पसरला आहे. कोरोना व्हायरस संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे जास्त लोकांच्या संपर्कात येण्यापासून वाचण्यासाठी तंत्रज्ञान कंपन्यांनी हा उपाय शोधला आहे. त्याचसोबत गूगल, मायक्रोसॉफ्ट आणि सिस्को यांनीही आपल्या सुविधा काही दिवस मोफत देण्याची घोषणा केली आहे. 

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी मंगळवारी जाहीर केले की जगभरातील सर्व G Suite ग्राहकांसाठी कंपनी हँगआउट मीट व्हीडिओ कॉन्फरन्सिंग सेवा विनामुल्य देईल. येत्या आठवडाभरापासून ते १ जुलैपर्यंत ही मोफत सेवा सुरु होईल. पोस्टनुसार, गुगल हँगआउट मीटिंगच्या माध्यमातून कर्मचारी घरातूनच मिटिंगसाठी उपस्थित राहू शकतील. एकाच कॉलमध्ये 250 कर्मचारी या मिटिंगमध्ये सहभागी होऊ शकेल. या व्यतिरिक्त एका डोमेनमध्ये 100,000 प्रेक्षकांसाठी लाइव्ह स्ट्रिमिंग केली जाऊ शकते. या मिटिंग रेकॉर्ड होतील आणि गूगल ड्रायव्हला सेव्ह केल्या जाऊ शकतात.

गुगलप्रमाणेच मायक्रोसॉफ्टनेही आपल्या टीम्स प्लॅटफॉर्मवर प्रत्येकाला सहा महिन्यांसाठी विनामूल्य सेवा देण्याची घोषणा केली आहे. सिस्कोनेही व्हिडीओ कॉन्फरन्सिंग साधन Webex विनामूल्य सेवा जाहीर केली आहे. ही सुविधा सिस्कोचे प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या सर्व देशात लागू होणार आहे. सिस्को, गूगल आणि मायक्रोसॉफ्टने दिलेली ही विनामूल्य सेवा लोकांना या कठीण काळात घरातून काम करण्यास मदत करेल अशी अपेक्षा कंपन्यांनी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोनाgoogleगुगलKarnatakकर्नाटकHealthआरोग्य