शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : धक्कादायक! कोरोना लस घेतल्यानंतर महिलेची प्रकृती बिघडली, झाला मृत्यू; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 14:29 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लस घेतल्यानंतर अचानक एका महिलेची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लसीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,30,27,621 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38,948 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 219 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,40,752 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर अचानक एका महिलेची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लसीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. 

हरियाणाच्या एका गावातील 46 वर्षीय महिलेने कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतर अचानक महिलेची प्रकृती बिघडू लागली. यानंतर आता 11 दिवसांनी महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेला श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागला. तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आरोग्य विभागाने कुटुंबीयांनी केलेले गंभीर आरोप नाकारले असून कोरोना लस घेतल्याने मृत्यू झाला नसल्याचं म्हटलं आहे. महिलेची कोरोना चाचणी केली असता तिचा रिपोर्ट देखील निगेटिव्ह आला आहे. 

महिलेला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, मांडी खुर्दा या गावात 24 ऑगस्ट रोजी उषा यांनी कोरोनाची लस घेतली होती. लस घेतल्यानंतर महिलेला ताप येऊ लागला. उषा यांची प्रकृती आणखीनच बिघडल्याचं त्यांच्या पतीने म्हटलं आहे. त्यांनी अनेकदा यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला पण उषा यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. श्वास घेण्यास त्यांना त्रास होत होता. अशातच शनिवारी त्यांची प्रकृती आणखीच ढासळली. उपचारासाठी रुग्णालयात नेलं असता याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उषा याआधी कधीच आजारी नव्हत्या. लस घेतल्याने त्या आजारी पडल्याचं नातेवाईकांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

कोरोना लस घेतल्यानंतर अर्ध्या तासातच वृद्धाचा मृत्यू; रांग सोडून लोकांनी ठोकली धूम

उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यामध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर अर्ध्या तासातच एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. वृद्धाच्या मृत्यूची माहिती मिळताच लसीसाठी रांगेत उभे असलेले लोक घाबरले आणि रांग सोडून घरी पळून गेले. महाराजगंजमधील लसीकरण केंद्रावर ही घटना घडली आहे. एका वृद्ध व्यक्तीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर अर्ध्या तासातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतDeathमृत्यू