Corona vaccine will be available in the country till December says Adar Poonawala | CoronaVirus News: देशात कधीपर्यंत उपलब्ध होणार कोरोनावरील लस?; सीरमचे अदार पूनावाला म्हणतात...

CoronaVirus News: देशात कधीपर्यंत उपलब्ध होणार कोरोनावरील लस?; सीरमचे अदार पूनावाला म्हणतात...

नवी दिल्ली : भारतात डिसेंबरपर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होईल, असे मत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी व्यक्त केले आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटिश-स्वीडिश फार्मा कंपनी एस्ट्राजेनेकाकडून विकसित केल्या जाणाऱ्या या लसीची किंमत पुढील दोन महिन्यांत जाहीर केली जाईल. सिरम ही जगातील मोठ्या वॅक्सिन निर्मात्या कंपन्यांपैकी एक आहे.

पूनावाला यांनी सांगितले की, आम्ही दोन आठवड्यांत चाचणी सुरू करणार आहोत. आॅगस्टअखेरपर्यंत लसीची निर्मिती सुरू होईल. आयसीएमआरच्या मदतीने काही हजार रुग्णांवर आम्ही देशात चाचणी घेणार आहोत. डिसेंबरअखेरपर्यंत ३० ते ४० कोटी डोसचे उत्पादन करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona vaccine will be available in the country till December says Adar Poonawala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.