शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

Corona Vaccine : कौतुकास्पद! 'या' गावातील लोक झाले 'लस'वंत; 18 किमी चालून आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलं लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 10:08 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासआठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही दोन कोटींच्या वर गेली आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. याच दरम्यान एक कौतुकास्पद घटना समोर येत आहे. देशात एक असं गाव आहे जिथे 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यात आलं आहे. 

जम्मू-काश्मीरच्या  (Jammu Kashmir) बांदीपोरा जिल्ह्यातील वेयान हॅमलेट हे गाव देशातलं पहिलं असं गाव ठरलं आहे, जिथे 18 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावात एकूण 362 वयस्कर लोक आहेत आणि त्या सर्वांनी लस घेतलेली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे आणि जिद्दीमुळे हे शक्य झालं आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेयान हे गाव बांदीपोरा जिल्हा मुख्यालयापासून केवळ 28 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र तिथे जाण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना जवळपास 18 किलोमीटरपर्यंत चालत जावं लागतं असं म्हटलं आहे. 

बांदीपोरा जिल्ह्याचे मुख्य चिकित्सा अधिकारी बशीर अहमद खान यांनी सांगितलं की गावात इंटरनेट सुविधा नसल्याने शहरातील लोकांप्रमाणे येथे लोक ऑनलाईन नोंदणी करू शकत नाही. त्यामुळे इथे नोंदणी झाली नाही. गावातली लसीकरण मोहिम जम्मू-काश्मीर मॉडेलच्या अंतर्गत करण्यात आली. हे मॉडेल म्हणजे पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना लस टोचण्याची 10 सूत्र असलेली एक रणनीती आहे. कोरोना लसीकरणामुळे सर्वत्र याच गावाची चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. अनेक कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांना काही भेटवस्तू दिल्या जात आहेत. अशीच एक घटना चेन्नईमध्ये घडली आहे. 

भारीच! "कोरोना लस घ्या आणि सोन्याची नाणी, स्कूटी, वॉशिंग मशीनसह भरपूर गिफ्ट्स मिळवा"

कोवलम भागातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी एका सेवाभावी संस्थेने लोकांना भन्नाट ऑफर दिली आहे. कोवलममध्ये एका सेवाभावी संस्थेच्या वतीने लस घेणाऱ्यांना एक प्लेट बिर्याणी आणि मोबाईल रिचार्जचं कूपन दिलं जात आहे. याशिवाय दर आठवड्याला लकी ड्रॉच्या माध्यमातून नागरिकांना सोन्याची नाणी, मिक्सर, स्कूटी, वॉशिंग मशीन अशा महागड्या गोष्टीही जिंकता येत आहेत. बक्षिसांसाठी अट फक्त एकच आहे ती म्हणजे कोरोना लस घेतली पाहिजे. कोवलम या भागाची लोकसंख्या साधारण 14,300 इतकी आहे. यामध्ये 18 वर्षांवरील वयोगटातले 6400 जण आहेत. या संस्थेचं म्हणणं आहे की अशा योजनांमुळे लस घेण्यासाठीची प्रेरणा मिळत आहे. या गावातील लोकांमध्ये लसीकरणाबाबत प्रचंड भीती आहे. त्यामुळे या गावातलं लसीकरण संथ गतीने सुरू होतं. सुरुवातीच्या काळात लसीकरण केंद्रांवर केवळ 50 ते 60 जण उपस्थित असायचे. मात्र, या संस्थेने नव्या योजनेची सुरुवात केल्यानंतर मात्र लस घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर