Corona Vaccine: कोरोना संक्रमितांना ‘Covaxin’ चा सिंगल डोसही लय भारी; ICMR चा दिलासादायक रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 06:24 PM2021-08-28T18:24:51+5:302021-08-28T18:44:24+5:30

भारताची पहिली स्वदेशी Covid 19 लस Covaxin चं कोडनेम BBV152 आहे. ही लस जानेवारी महिन्यात आपत्कालीन वापरासाठी केंद्राने परवानगी दिली होती.

Corona Vaccine Single dose of Covaxin is also effective on Covid infected says ICMR | Corona Vaccine: कोरोना संक्रमितांना ‘Covaxin’ चा सिंगल डोसही लय भारी; ICMR चा दिलासादायक रिपोर्ट

Corona Vaccine: कोरोना संक्रमितांना ‘Covaxin’ चा सिंगल डोसही लय भारी; ICMR चा दिलासादायक रिपोर्ट

googlenewsNext
ठळक मुद्देSARS COV 2 संक्रमित लोकांची अँन्टिबॉडी तुलनेने अशा लोकांसोबत केली गेली ज्यांना कोरोनाची लागण झाली नव्हती.हे नमुने लसीचे पहिला डोस घेतल्यानंतर घेतले होते. ICMR NIRT नं या रिपोर्टला परवानगी दिली आहे.लसीच्या मर्यादित पुरवठ्यात जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण केले जाऊ शकते.

नवी दिल्ली – देशात कोविड १९ ची दुसरी लाट अद्याप सुरुच असून सप्टेंबर-ऑक्टोबर महिना खूप महत्त्वाचा असल्याचं अलीकडेच केंद्रीय आरोग्य विभागाने नागरिकांना सूचित केले होते. जानेवारीपासून देशात लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहेत. देशात कोविड रुग्णांची संख्या कमी होत असतानाच केरळमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. यात ICMR चा एक महत्त्वपूर्ण रिपोर्ट समोर आला आहे.

कोरोना संक्रमित होणाऱ्या लोकांमध्ये भारत बायोटेक(Bharat Biotech) ची कोरोना लस कोव्हॅक्सिन(Covaxin) चा सिंगल डोसही अँन्टिबॉडी वाढवण्यासाठी प्रभावी ठरत आहे. ज्यांना कोविड संक्रमण झालं नाही आणि लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांपेक्षा तुलनेत हे प्रमाण सिद्ध झालं आहे. ICMR नं शनिवारी इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित झाले आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, जर मोठ्या लोकसंख्येत रिपोर्टमध्ये प्रारंभित स्वरुपात निष्कर्षाची पुष्टी केली गेली तर पहिल्यांदा SARS COv2 संक्रमित झालेल्या लोकांना BBV152 लसीचा एक डोस दिला जाऊ शकतो. त्यामुळे लसीच्या मर्यादित पुरवठ्यात जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण केले जाऊ शकते.

भारताची पहिली स्वदेशी Covid 19 लस Covaxin चं कोडनेम BBV152 आहे. ही लस जानेवारी महिन्यात आपत्कालीन वापरासाठी केंद्राने परवानगी दिली होती. दोन डोसवाल्या या लसींमध्ये ४ ते ६ आठवड्यांचं अंतर ठेवलं जातं. रिपोर्टनुसार, SARS COV 2 संक्रमित लोकांची अँन्टिबॉडी तुलनेने अशा लोकांसोबत केली गेली ज्यांना कोरोनाची लागण झाली नव्हती. चेन्नईमध्ये फेब्रुवारी ते मे २०२१ दरम्यान, लसीकरण केंद्रावर BBV152 लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रक्ताचे नमुने घेतले गेले. हे नमुने लसीचे पहिला डोस घेतल्यानंतर घेतले होते. ICMR NIRT नं या रिपोर्टला परवानगी दिली आहे.

अँन्टिबॉडी पातळी तीन स्तरावर मापण्यात आली. १) लसीकरणानंतरचे दिवस, २) पहिल्या डोसच्या एक महिन्यानंतर ३) पहिल्या डोसच्या दोन महिन्यानंतर. कोविड संक्रमण झालेल्या सर्व लोकांच्या लसीकरणाची वेळ जाणण्यायोग्य अँन्टिबॉडी शोधली गेली. ICMR चे वैज्ञानिक लोकेश शर्मा म्हणाले की, हा प्राथमिक स्वरुपातील रिपोर्ट आहे. जर मोठ्या लोकसंख्येच्या रिपोर्टमध्ये याप्रकारच्या निष्कर्षाची पुष्टी केली गेली तर पहिल्यांदा संक्रमित झालेल्या कोविड रुग्णांमध्ये BBV152 लसीचा एक डोस दिला जाऊ शकतो. जेणेकरून मर्यादित लसींच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात लोकांचे लसीकरण केले जाऊ शकते.

Web Title: Corona Vaccine Single dose of Covaxin is also effective on Covid infected says ICMR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.