शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

Corona Vaccine: चर्चा खूप झाल्या, देशवासीयांना लस मोफत मिळायला हवी; राहुल गांधींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 13:21 IST

Corona Vaccine: भारतात सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोलदेशवासीयांना मोफत लस देण्याची मागणीदेशाला भाजपच्या सिस्टीमचा विक्टीम होऊ देऊ नका - गांधी

नवी दिल्ली: गेल्या सलग काही दिवसांपासून देशभरात प्रतिदिन तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. तसेच ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन यांचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. देशातील तिसऱ्या टप्प्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. अनेक राज्यांनी कोरोना लस मोफत मिळेल, असे जाहीर केले आहे. अशातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी संपूर्ण देशवासीयांना कोरोनाची लस मोफत मिळावी, अशी मागणी केली आहे. (corona vaccine rahul gandhi demands for free vaccination all people in country)

राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली असून, ते गृह विलगीकरणात आहेत. राहुल गांधी सातत्याने देशातील परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत. यासंदर्भात राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याची मागणी राहुल गांधी यांनी यावेळी केली आहे. 

कोरोना लस मोफत द्या आणि विषय संपवा

चर्चा खूप झाल्या, देशवासीयांना कोरोना लस मोफत मिळायला हवी. विषय संपला. भारताला भाजपच्या यंत्रणेची शिकार होऊ देऊ नका, असा आरोप राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. 

“कृपा करा, दिल्लीला ऑक्सिजन द्या”; अंबानीसह देशातील बड्या उद्योगपतींना केजरीवालांचे पत्र

हाच काँग्रेसचा धर्म

तर, यंत्रणा कोलमडून गेल्या आहेत. आता तरी जन की बात करा. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची गरज आहे. काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सर्व राजकीय कामे बाजूला ठेवावीत आणि जनतेला मदत करावी. कोणत्याही परिस्थितीत देशातील जनतेची दु:ख दूर करा. हाच काँग्रेसचा धर्म आहे, असेही एक ट्विट राहुल गांधी यांनी केले होते. 

पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार; केंद्राची घोषणा

दरम्यान, भारतात सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत ३ लाख ५२ हजार ९९१ कोरोना रुग्ण आढळले असून यासोबत एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ इतकी झाली आहे. तर २८१२ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १ लाख ९५ हजार १२३ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासांत २ लाख १९ हजार २७२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४ हजार ३८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसprime ministerपंतप्रधानCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी