शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine: १२ वर्षे वयावरील सर्व मुलांसाठी फायझर लस प्रभावी असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 06:59 IST

Corona vaccine News: आम्ही बनविलेली कोरोना प्रतिबंधक लस १२ वर्षे वयावरील सर्व मुलांसाठी प्रभावी ठरली असून तिच्या आपत्कालीन वापरासाठी तातडीने मंजुरी द्यावी अशी विनंती फायझर या कंपनीने केंद्र सरकारला केली आहे.

नवी दिल्ली : आम्ही बनविलेली कोरोना प्रतिबंधक लस १२ वर्षे वयावरील सर्व मुलांसाठी प्रभावी ठरली असून तिच्या आपत्कालीन वापरासाठी तातडीने मंजुरी द्यावी अशी विनंती फायझर या कंपनीने केंद्र सरकारला केली आहे. भारतात कोरोना विषाणूचा जो नवा प्रकार फैलावला आहे त्यावरही ही लस परिणामकारक असल्याचा दावा फायझरने केला आहे. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, फायझर कंपनीची लस दोन ते आठ अंश सेल्सिअस इतक्या तापमानात शीतगृहामध्ये किमान एक महिना अत्यंत सुरक्षित पद्धतीने ठेवता येते. या लसीला आपत्कालीन वापरासाठी तातडीने मंजुरी मिळाल्यास जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत ५ कोटी डोस देण्याची तयारी फायझर कंपनीने दाखविली आहे. मात्र या लसीमुळे काही प्रतिकूल घटना घडल्या तर त्यावेळी नुकसान भरपाई देण्याच्या खटल्यांपासून या कंपनीला केंद्र सरकारकडून संरक्षण हवे आहे. मात्र देशात कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुतनिक या तीन लसींचा सध्या वापर सुरू असून त्यांच्या उत्पादक कंपन्यांना अशी कोणतीही सूट भारताने दिलेली नाही. देशात एसएआरएस-सीओव्ही-२ हा कोरोना विषाणूचा प्रकार सध्या थैमान घालत असून त्याच्यावर फायझरची लस प्रभावी असल्याचा फायझरचा दावा आहे. भरपाई प्रश्नावरही चर्चाकेंद्र सरकार व फायझर कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये गेल्या आठवड्यात एक बैठक झाली. जागतिक आरोग्य संघटना व विविध देशांत फायझरच्या लसीचा किती प्रभाव दिसला याबद्दल कंपनीकडून केंद्राला सविस्तर माहिती देण्यात आली. केंद्राने फायझरच्या लसीची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याच्या तसेच नुकसान भरपाईच्या विषयावर सरकारी अधिकाऱ्यांनी फायझर कंपनीशी चर्चा केली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारतHealthआरोग्य