शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

Corona Vaccine : निष्काळजीपणाचा कळस! दोन मुलांना कोवॅक्सीन ऐवजी दिली कोविशिल्ड; सर्टिफिकेटवर लिहिलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 17:05 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना लसीकरणाच्या बाबतीत पुन्हा एकदा आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा समोर आला आहे.

नवी दिल्ली - ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन देशभरात 15 ते 18 वर्षे वयाच्या मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी 40 लाखांहून अधिक मुलांना लस देण्यात आली. 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना भारत बायोटेकने बनविलेली कोवॅक्सिन ही लस देण्यात येणार आहे. 12 वर्षे वयावरील मुलांना कोवॅक्सिन लस देण्यासाठी औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकला 24 डिसेंबर रोजी सशर्त परवानगी दिली होती. देशात या वयोगटातील सुमारे 10 कोटी मुले आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

कोरोना लसीकरणाच्या बाबतीत पुन्हा एकदा आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. देशातील मुलांना आता कोरोना लसीचा डोस दिला जात असतानाच भोंगळ कारभार उघड झाला आहे. दोन मुलांना कोवॅक्सीन ऐवजी कोविशिल्ड दिल्य़ाचा धक्कादायक प्रकार बिहारमधील नालंदा येथे घडला आहे. बिहारशरीफ येथील प्रोफेसर कॉलनी येथे ही दोन्ही मुलं राहतात. दोघेही सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नालंदा आरोग्य विभागातर्फे चालवण्यात येणाऱ्या लसीकरण केंद्राच्या आयएमए हॉलमध्ये पोहोचले होते. येथे दोघांचंही लसीकरण करण्यात आलं.

लस दिल्यानंतर आता पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मुलाला आणि त्याच्या भावाला कोवॅक्सीन ऐवजी कोविशिल्ड दिल्याचं समजलं. याबद्दल विचारले असता ऑपरेटरने Covishield घेतल्याने कोणतीही अडचण येणार नाही असं उत्तर दिलं. या मुलांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. कोरोना लस दिल्यानंतर ते सीएस कार्यालयात गेले असता त्यांना दीड तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आणि काही अडचण आल्यास वैद्यकीय पथक त्यांच्या घरी जाईल असे सांगून त्यांना परत पाठविण्यात आले. लस दिल्यानंतर आता पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आपल्या मुलांना काही होणार तर नाही ना? याची त्यांना भीती वाटते. 

सर्टिफिकेटवर कोवॅक्सीन दिल्याचा उल्लेख 

वडिलांनी सांगितलं की, एकीकडे लस देताना निष्काळजीपणा केला जात आहे तर दुसरीकडे सर्टिफिकेटवर कोवॅक्सीन दिल्याचा उल्लेख केला आहे. याबाबत तक्रार केली असता लस देणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांना तेथून हटवण्यात आले. यानंतर पुढे काय कारवाई झाली, याबाबत कोणतीही माहिती नाही. या प्रकरणी सिव्हिल सर्जन डॉ. सुनील कुमार यांनी याबाबत माहिती मिळाल्याचे सांगितले. लस देणाऱ्या व्यक्तीकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. मुलाच्या कुटुंबीयांना धीर दिला आहे. त्यांना आरोग्य विभागाचा क्रमांक देण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांच्यासाठी 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस