शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine ची गरज भासताच बदलले कॅनडाचे सूर, शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेचे केले कौतुक

By बाळकृष्ण परब | Updated: February 13, 2021 08:33 IST

Farmers Protest : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र आता कॅनडाचे सूर बदलले आहेत.

ठळक मुद्देकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाबाबत भारत सरकारने केलेल्या चर्चेच्या प्रस्तावाचे कौतुक केले आहेकोरोनाचा प्रकोप वाढल्यानंतर कोरोनावरील लसीची गरज भासल्यावर कॅनडाचे सूर बदलू लागले आहेतकॅनडा सरकार कॅनडामध्ये असलेल्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरू झाल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र भारताने परखड प्रतिक्रिया दिल्यानंतर तसेच कोरोनाचा प्रकोप वाढल्यानंतर कोरोनावरील लसीची (Corona vaccine) गरज भासल्यावर कॅनडाचे सूर बदलू लागले आहेत. भारताच्या व्हॅक्सिन डिप्लोमसीमुळे गुरुवारी कॅनडाच्या पंतप्रधानांनी जस्टिन ट्रुडो (justin trudeau) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi)कौतुक केले होते. तसेच कॅनडाला भासणाऱ्या लसीच्या गरजेबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कल्पना दिली होती.दरम्यान, कॅनडाच्या पंतप्रधानांनी आज शेतकरी आंदोलनाबाबतही भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेबाबत कौतुक केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले की, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाबाबत भारत सरकारने केलेल्या चर्चेच्या प्रस्तावाचे कौतुक केले आहे. त्याबरोबरच जस्टिन ट्रुडो यांनी सांगितले की, त्यांचे सरकार कॅनडामध्ये असलेल्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे.कोरोनावरील लसीबाबत कॅनडाकडून मदत मागण्यात आली होती. त्यावर भारताने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती. त्यात म्हटले होते की, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी फोन करून कोरोनावरील लसीबाबत चर्चा केली होती. मोदींकडून लसीबाबत मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याशिवाय दोन्ही नेत्यांनी हवामानातील बदल आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चर्चा केली होती.याबाबत जस्टिन ट्रुडो यांनी म्हटले आहे की, त्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी लोकशाहीच्या तत्त्वांसाठी दोन्ही देशांची कटिबद्धता, हल्लीच झालेली आंदोलने आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या महत्त्वावर चर्चा झाली. तसेच आम्ही यापुढेही संपर्कात राहण्याबाबत सहमती दर्शवली, असे ट्रुडो यांनी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCanadaकॅनडाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन