शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : बापरे! कोरोना लस घेतल्यानंतर चक्कर आली अन् गमावला जीव; कुटुंबीयांनी केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 13:05 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लस घेतल्यानंतर एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याची घटना घडली आहे. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 30,256 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 295 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,45,133 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रुग्णांचा आकडा 33,478,419 वर पोहोचला आहे. याच दरम्यान लसीकरणासंदर्भात काही घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याची घटना घडली आहे. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील नूंह खंड गावात कोरोना लस घेतल्यानंतर एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण अभियान सुरू करण्यात आलं होतं. याच दरम्यान गावातील 52 वर्षीय लल्लू यांनी लस घेतली. लस घेतल्यानंतर ते काही वेळ लसीकरण केंद्रावर बसले होते. मात्र त्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली. चक्कर आली आणि ते खाली पडले. तेथे उपस्थित असलेल्या लोकांना डॉक्टरांना याबाबत तातडीने माहिती दिली. डॉक्टरांना त्यांना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान लल्लू यांचा मृत्यू झाला. 

कोरोना लस घेतल्यानंतर प्रकृती बिघडली

लसीकरण अधिकारी डॉ, बसंत दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लल्लू यांना 12 वर्षांपूर्वी पॅरालिसिस झालं होतं. ज्याच्यामुळे त्यांचे हात-पाय अद्यापही काम करत नाहीत. तसेच त्यांना उच्च रक्तदाबाचा देखील त्रास होता. मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना दारुचं देखील व्यसन होतं. पण तरी देखील त्यांनी कोरोनाची लस घेतली. त्यांचा मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून त्यातून नेमकं कारण समोर येईल असं देखील म्हटलं आहे. पण कुटुंबीयांनी लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बापरे! भाजपा नेत्याला देण्यात आले कोरोना लसीचे 5 डोस; सहावा डोसही शेड्यूल, हैराण करणारं प्रकरण

भाजपाच्या एका नेत्याला एक दोन नव्हे तर तब्बल 5 वेळा कोरोना डोस देण्यात आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. कोरोना लसीचे पाच डोस दिलेले असले तरी आता सहावा डोस शेड्यूल असल्याची माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील सरधाना भागात ही हैराण करणारी घटना घडली आहे. लसीकरणाच्या प्रमाणपत्रातून हे समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 73 वर्षीय रामपाल सिंह हे बूथ क्रमांक 79 चे भाजपा अध्यक्ष आहेत आणि हिंदू युवा वाहिनीचे सदस्य आहेत. त्यांनी लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड केल्यावर त्यात त्यांना लसीचे पाच डोस देण्यात आल्याचं लिहिलं आहे. रामपाल सिंह यांनी आरोग्य विभागावर निष्काळजीपणाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. त्याच्या तक्रारीनंतर या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसDeathमृत्यूIndiaभारत