शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

"कोरोनाच्या लसीमध्ये वापरण्यात आलं गायीचं रक्त"; हिंदू महासभेच्या नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 11:49 IST

Swami Chakrapani Over Corona Vaccine : हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणि यांनी कोरोना लसीसंदर्भात सवाल उपस्थित केला आहे. स्वामी चक्रपाणि यांनी कोरोनाच्या लसीमध्ये गायीचं रक्त वापरण्यात आल्याचा दावा केला आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांचा आकडा तब्बल 1,02,24,303 वर पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. लस तयार करण्यात येत असून काही ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. मात्र आता कोरोनाची लस येण्याआधीच यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. मुस्लीम संघटनांपाठोपाठ आता हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणि यांनी कोरोना लसीसंदर्भात सवाल उपस्थित केला आहे. स्वामी चक्रपाणि यांनी कोरोनाच्या लसीमध्ये गायीचं रक्त वापरण्यात आल्याचा दावा केला आहे. 

गायीचं रक्त असणारी कोरोना लस देशामध्ये वापरण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी स्वामी चक्रपाणि यांनी केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना  चक्रपाणि यांनी यासंदर्भात एक निवेदनही दिल्याची माहिती मिळत आहे. स्वामी चक्रपाणि यांनी केलेल्या निवेदनामध्ये जोपर्यंत कोरोनाची लस कशा पद्धतीने बनवण्यात आली आहे हे स्पष्टपणे सांगितलं जात नाही आणि ही लस एखाद्या व्यक्तीच्या धर्माविरोधात तर नाही हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत या लसीचा भारतात वापर केला जाऊ नये, असं म्हटलं आहे. 

स्वामी चक्रपाणि यांनी "कोरोना संपला पाहिजे आणि लसही लवकरात लवकर देण्यात आली पाहिजे. मात्र यासाठी आपला धर्म भ्रष्ट करता येणार नाही. जेव्हा कोणतीही कंपनी एखादं औषध बनवते तेव्हा त्यामध्ये काय आहे याची माहिती दिली जाते. मग कोरोनाच्या लसीसंदर्भातील माहिती का सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिली जात नाही. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकामध्ये जी लस तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये गायीचं रक्त वापरण्यात आलं आहे" असा दावा केला आहे.

"जर गायीचं रक्त आपल्या शरीरामध्ये गेलं तर तो आपला धर्म भ्रष्ट करण्याचा प्रयत्न असेल"

"सनातन धर्मामध्ये गायीला मातेसमान मानण्यात येतं. जर गायीचं रक्त आपल्या शरीरामध्ये गेलं तर तो आपला धर्म भ्रष्ट करण्याचा प्रयत्न असेल. सनातन धर्माला संपवण्यासाठी अनेक वर्षांपासून असे कट रचले जात आहेत. त्यामुळेच कोरोनाची कोणतीही लस येत असेल तर आधी त्यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली जावी. जेव्हा सर्व शंका दूर होतील त्यानंतरच लसीकरणाचं काम हाती घेण्यात यावं" असं देखील स्वामी चक्रपाणि यांनी म्हटलं आहे. चक्रपाणि यांनी प्रामुख्याने अमेरिकेतील लसीसंदर्भात भाष्य केलं आहे. गायीचं रक्त वापरण्यात आलेली लस ही अमेरिकेतील लस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतcowगायAmericaअमेरिका