शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine: विदेशातील परिणामकारक लसींच्या भारतात चाचण्या करण्याची अट रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 06:39 IST

Corona vaccine News: भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेत सध्या कोवॅक्सिन, कोविशिल्ड व स्पुतनिक या तीन लसींचा वापर केला जात आहे. त्यापैकी पहिल्या दोन लसींचे उत्पादन भारतात होते व स्पुतनिक ही रशियन बनावटीची लस आहे.

नवी दिल्ली : विदेशात विकसित झालेल्या व परिणामकारक ठरलेल्या कोरोना लसींच्या भारतात पुन्हा चाचण्या करण्याचे बंधन केंद्र सरकारने आता दूर केले आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजविला असून लसींचा तुटवडाही जाणवत आहे. त्यामुळे देशविदेशातील अधिकाधिक लसी उपलब्ध होणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतला आहे.भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेत सध्या कोवॅक्सिन, कोविशिल्ड व स्पुतनिक या तीन लसींचा वापर केला जात आहे. त्यापैकी पहिल्या दोन लसींचे उत्पादन भारतात होते व स्पुतनिक ही रशियन बनावटीची लस आहे. सध्या देशात कोरोना लसींचा मोठा तुटवडा असून त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवरही झाला आहे. त्यामुळे कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा होण्याबाबत केंद्र सरकार फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडेर्ना आदी विदेशी औषध कंपन्यांशी सध्या चर्चा करत आहे.विदेशात बनलेल्या कोरोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन वापरासाठी तात्काळ  मंजुरी दिली जाईल, असे गेल्या महिन्यात केंद्र सरकारने जाहीर केले होते. मात्र, या लसींच्या भारतात चाचण्या झाल्या पाहिजेत या अटीवर केंद्र सरकार ठाम होते. त्यामुळे विदेशातील एकाही लसनिर्मिती कंपनीने केंद्राकडे अर्ज पाठविला नाही. मात्र, आता ही अट केंद्र सरकारने आता रद्द केली आहे.विदेशी लसनिर्मिती कंपन्यांनी आपली कोरोना प्रतिबंधक लस घेऊन भारतात यावे. त्या लसीचे भारत व जगासाठी इथे उत्पादन करावे, असे नवे धोरण केंद्र सरकारने राबवायचा निर्णय घेतला आहे. देशातील फक्त ३ टक्के लोकांचेच अद्याप लसीकरण होऊ शकले आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आता त्वरेने पावले उचलणे आवश्यक बनले आहे.फक्त केंद्र सरकारशीच  चर्चा करणारकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या पहिल्या दहा देशांत भारतातील लसीकरणाचा वेग खूपच कमी आहे. कोरोना लसींचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा व्हावा यासाठी देशातील काही राज्यांनी जागतिक निविदाही काढल्या. पण फायझर, मॉडेर्नासारख्या औषध कंपन्यांनी आम्ही फक्त केंद्र सरकारशीच चर्चा करणार असल्याची भूमिका घेतली आहे. 

१२ वर्षे वयावरील सर्व मुलांसाठी फायझरची लस प्रभावी असल्याचा दावाआम्ही बनविलेली कोरोना प्रतिबंधक लस १२ वर्षे वयावरील सर्व मुलांसाठी प्रभावी ठरली असून तिच्या आपत्कालीन वापरासाठी तातडीने मंजुरी द्यावी अशी विनंती फायझर या कंपनीने केंद्र सरकारला केली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य