शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत काय म्हणाले सरकार? जाणून घ्या, सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 13:57 IST

corona vaccine booster dose : जगातील अनेक विकसित देशांनी कोरोनाविरुद्ध बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा प्रश्न समोर येत आहे की, भारतात कोरोना लसीचा बूस्टर डोस कधी दिला जाईल? यावर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोना व्हायरसचा कहर सातत्याने वाढत आहे. या साथीच्या आजाराविरुद्ध लस सर्वात मोठे शस्त्र मानले जात आहे. भारतात सध्या 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जात आहे. तर जगातील अनेक विकसित देशांनी कोरोनाविरुद्ध बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा प्रश्न समोर येत आहे की, भारतात कोरोना लसीचा बूस्टर डोस कधी दिला जाईल? यावर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे आणि म्हटले आहे की, सध्या प्राधान्य दोन डोसचे पूर्ण लसीकरण आहे.

बूस्टर डोस वैज्ञानिक चर्चेत मुख्य नाही - आरोग्य मंत्रालय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  (Health Ministry) हे स्पष्ट केले आहे की, भारताची प्राधान्यता सर्व लोकांना कोरोना लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस देणे आहे आणि हे चालूच राहणार आहे. वर्षाच्या अखेरीस प्रत्येकाला लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. बूस्टर डोस (Covid-19 Vaccine Booster Dose) यावेळी वैज्ञानिक चर्चेत मुख्य विषय नाही.

दोन्ही डोसचे पूर्ण लसीकरण आवश्यक - आयसीएमआरअनेक एजन्सींनी शिफारस केली आहे की, अँटीबॉडीची पातळी मोजली जाऊ नये. परंतु हे समजून घेणे महत्वाचे की दोन्ही डोसचे संपूर्ण लसीकरण आहे आणि कोणतीही शिथिलता नसावी, असे कोविड -19 वर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ब्रीफिंग दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे डीजी डॉ. बलराम भार्गव (ICMR DG Balram Bhargava)म्हणाले. तसेच, सरकारच्या वैज्ञानिक आणि सार्वजनिक आरोग्य सेवा चर्चेत यावेळी बूस्टर डोस हा मुख्य विषय नाही. दोन डोससह पूर्णपणे लसीकरण हे मुख्य प्राधान्य आहे, असे डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले.

99 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस भारतातील 20 टक्के वयस्कर लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत आणि 62 टक्के लोकांना किमान एक डोस मिळाला आहे. 99 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे आणि 82 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. 100 टक्के आघाडीच्या कामगारांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर 78 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले.

देशभरात 77.25 कोटी लोकांनी घेतले डोसकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत भारतात कोरोना लसीचे 77 कोटी 24 लाख 25 हजार 744 डोस देण्यात आले आहेत. देशभरात 58 कोटी 26 लाख 6 हजार 905 लोकांनी किमान एक डोस घेतला आहे, तर 18 कोटी 98 लाख 18 हजार 839 लोकांना दोन्ही डोस दिले आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य