शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

CoronaVirus: सोशल मिडियावर व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट शेअर करू नका, अन्यथा...; सरकारचा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 15:40 IST

हे ट्विट Cyber Dost च्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे. हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने तयार केलेले एक सेफ्टी आणि सायबर सिक्योरिटी जागरूकतेचे साधन आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोना विरोधातील लसीकरण प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. आता देशात 18 वर्षांवरील लोकांनाही लस देण्यात येत आहे. आपन लस घेतली असेल तर आपल्याला माहितच असेल, की लस घेतल्यानंतर सरकार प्रत्येक व्यक्तीला एक व्हॅक्सीन सर्टिफिकेट देत आहे. हे सर्टिफिकेट आपण सोशल मीडियावर शेअर केले असेल, तर आपल्याला सावधान व्हावे लागेल. कारण यामुळे आपली मोठी फसवणूक होऊ शकते. (CoronaVirus Beware of sharing vaccination certificate on social media it will be dangerous say cyber dost)

Cyber Dost नं ट्विट करत लोकांना केलं सावध -सरकारने (Cyber Dost) ट्विट करत लोकांना कोविड-19 व्हॅक्सीन सर्टिफिकेट ऑनलाइन शेअर न करण्याचा इशारा दिला आहे. असा इशारा देण्यामागे एक मोठे कारण आहे. खरेतर, व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटमध्ये नाव, वय आणि लिंग तसेच पुढील डोसच्या तारखेसह विविध प्रकारची माहिती असते. पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे, की या माहितीचा उपयोग बनावट कागदपत्रे तयार करून फसवणुकीसाठीही केला जाऊ शकतो. यामुळे आपल्याला यापासून सावध रहायला हवे.

हे ट्विट Cyber Dost च्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे. हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने तयार केलेले एक सेफ्टी आणि सायबर सिक्योरिटी जागरूकतेचे साधन आहे. ट्विटमध्य शेअर करण्यात आलेल्या फोटोत लिहिण्यात आले आहे, की 'Covid-19 व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटमध्ये व्यक्तीचे नाव आणि इतर खासगी माहिती असते. सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आपले व्हॅक्सीन सर्टिफिकेट शेअर करू नये. कारण सायबर गुन्हेगार आपल्याला धोका देण्यासाठी याचा वापर करू शकतात.'

म्हणून जारी केले जाते सर्टिफिकेट -पहिल्या डोसनंतर सरकार एक प्रोव्हिजनल सर्टिफिकेट जारी करते. यात खासगी माहितीसोबतच दुसऱ्या डोसचीही तारीख असते. तर फायनल सर्टिफिकेट दुसरा डोस घेतल्यानंतर दिले जाते. हे व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट भविष्यात इंटरनॅशनल ट्रॅव्हलसह अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरू शकते. हे सर्टिफिकेट ऑनलाईन आरोग्य सेतू अॅप अथवा CoWin पोर्टलवरूनही डाउनलोड केले जाऊ शकते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCentral Governmentकेंद्र सरकार