Corona Vaccine : देशात रोज १.५० कोटी लस मात्रा देण्याची गरज, ३१ डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरणाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 07:40 AM2021-10-25T07:40:15+5:302021-10-25T07:40:35+5:30

Corona Vaccine : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ डिसेंबर, २०२१ अखेर सर्व प्रौढांना लस देण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले असल्यामुळे २ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला येत्या १ जानेवारीपासून प्रारंभ केला जाऊ शकेल.

Corona Vaccine: 1.50 crore vaccines needed daily in the country, challenge to complete vaccination by 31st December pdc | Corona Vaccine : देशात रोज १.५० कोटी लस मात्रा देण्याची गरज, ३१ डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरणाचे आव्हान

Corona Vaccine : देशात रोज १.५० कोटी लस मात्रा देण्याची गरज, ३१ डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरणाचे आव्हान

Next

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : भारतात संपूर्ण प्रौढांचे लसीकरण करण्यासाठी येत्या ६९ दिवसांत रोज १.५ कोटी लस मात्रा द्याव्या लागतील. २०११ च्या जनगणनेनुसार प्रौढांची संख्या आहे ९४ कोटी असून ती आता १०० कोटींच्या पुढे गेली आहे. त्यामुळे दरमहा जलदगतीने लसीकरण करावे लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ डिसेंबर, २०२१ अखेर सर्व प्रौढांना लस देण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले असल्यामुळे २ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला येत्या १ जानेवारीपासून प्रारंभ केला जाऊ शकेल.
२३ ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत देशात १०० कोटी प्रौढांना लस दिली गेलेली आहे. यात ७० कोटी लोकांना पहिली लस मिळाली आहे तर ३० कोटी जणांना दोन्ही लस मात्रा मिळाल्या आहेत. १०० कोटी लस मात्रांचे लक्ष्य  २७९ दिवसांत गाठले गेले आहे. राहिलेल्या १०० कोटी मात्रा ६९ दिवसांत पूर्ण कराव्या लागतील व हे काम फारच आव्हानात्मक आहे. परंतु, सरकारचे लक्ष्य आहे ते सर्व प्रौढांना किमान पहिली मात्रा तरी दिली जावी.
भारताच्या कोविड-१९ लसीकरण टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘आम्ही ७५ टक्के प्रौढांना लसीची पहिली मात्रा दिली आहे. 

Web Title: Corona Vaccine: 1.50 crore vaccines needed daily in the country, challenge to complete vaccination by 31st December pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app