शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

corona vaccination : ४५ वर्षे वयावरील सर्वांचे आजपासून लसीकरण, को-विन ॲपवर दुपारी तीननंतर नोंदणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 07:16 IST

corona vaccination Update : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी अधिकाधिक लोकांचे लसीकरण व्हावे, या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने ४५ वर्षे वयावरील लोकांच्या लसीकरणाला मान्यता दिली आहे.

- एस. के. गुप्तानवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी अधिकाधिक लोकांचे लसीकरण व्हावे, या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने ४५ वर्षे वयावरील लोकांच्या लसीकरणाला मान्यता दिली आहे. या मोहिमेला आज, १ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. को-विन ॲपवर ज्यांनी नोंदणी केली नसेल ते रुग्णालयांत किंवा लसीकरण केंद्रावर लसीसाठी दुपारी ३ नंतर नोंदणी करू शकणार आहेत.  केंद्र सरकारने सुरू केलेल्या देशव्यापी लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून कोणतीही सहव्याधी नसलेल्या आणि वयाची ४५ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींना १ एप्रिलपासून कोरोनाप्रतिबंधक लस घेता येणार आहे. याआधी सहव्याधी असलेल्या ४५ वर्षे वयावरील लोकांना लस घेण्याची परवानगी होती.  कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या लोकांचे प्रमाण ८० टक्के आहे. या पार्श्वभूमीवर ४५ वर्षे वयावरील लोकांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानंतर ४५ हून कमी वय असलेल्या लोकांच्या लसीकरणाला सुरुवात होईल. - राजेश भूषण, केंद्रीय आरोग्य सचिव. कसे करणार लसीकरण?  cowin.gov.in हे संकेतस्थळ किंवा को-विन ॲपवर जाऊन नोंदणी करावी लागेल  नोंदणीनंतरच लसीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाण इत्यादीची माहिती मिळेल  लसीकरण केंद्रावर जाताना पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, रेशन कार्ड वा बँकेचे पासबुक यापैकी कोणतेही एक दस्तऐवज घेऊन जावेnत्यावरून तुमची जन्मतारीख समजण्यास यंत्रणांना सोपे होईल. कोण असेल पात्र? ज्यांचे जन्मसाल १९७७ असेल त्यांना लसीकरणासाठी नोंदणी करता येणार नाही. ३१ डिसेंबर १९७६ पर्यंत ज्यांची जन्मतारीख असेल तेच लसीकरणासाठी पात्र ठरतील. राज्याला २६ लाख कोविशिल्ड डोसचा साठाराज्यात आजपासून ४५ वर्षांहून अधिक व्यक्तींना लसीकरणाचा टप्पा सुरू होणार असून, केंद्र शासनाकडून राज्याला २६.७७ लाख कोविशिल्डचे डोस मिळाले आहेत. -सविस्तर/८

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत