Corona Vaccination: कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नका, कारण...; पंतप्रधान नरेंद्र मोदींना तज्ज्ञांनी सोपवला महत्त्वाचा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 09:33 AM2021-06-11T09:33:44+5:302021-06-11T09:35:31+5:30

Corona Vaccination for All Updates: देशातील कोरोनाची सध्या आकडेवारी पाहता या काळात सर्वांसाठी कोरोना लसीकरण करण्यावर विचार करायला हवा. हा रिपोर्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोपवला आहे.

Corona Vaccination: Unplanned Vaccination May Promote Virus Mutation, Health Experts Report | Corona Vaccination: कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नका, कारण...; पंतप्रधान नरेंद्र मोदींना तज्ज्ञांनी सोपवला महत्त्वाचा रिपोर्ट

Corona Vaccination: कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नका, कारण...; पंतप्रधान नरेंद्र मोदींना तज्ज्ञांनी सोपवला महत्त्वाचा रिपोर्ट

Next
ठळक मुद्देसार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांच्या गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीकरणाचा अहवाल दिलाअहवालात असे म्हटले आहे की, जे कोरोनातून बरे झाले आहेत त्यांना लस देण्याची गरज नाहीमोठ्या प्रमाणावर लसीकरणापेक्षा जास्त जोखीम असलेल्या लोकांवर लक्ष केंद्रित करा

नवी दिल्ली – देशात कोरोनाची दुसरी लाट पसरलेली असताना केंद्र सरकारनं लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे. १८ वर्षावरील सर्व नागरिकांचं मोफत लसीकरण केले जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानंतर आता तज्ज्ञांनी पंतप्रधानांना एक रिपोर्ट सुपूर्द केला आहे. जे लोक कोरोनातून बरे झालेत त्यांना लसीची आवश्यकता नाही अशी शिफारस तज्त्रांनी पंतप्रधानांना अहवालातून केली आहे.

या तज्त्रांनी सांगितले आहे की, मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम आखणण्याऐवजी ज्यांना लोकांना अधिक धोका आहे अशांचं लसीकरण केलं जावं. मोठ्या प्रमाणात लसीकरण हे अपूर्ण होऊ शकतं त्यामुळे व्हायरस म्यूटेंट आणखी जास्त पसरू शकतं असं तज्त्रांना वाटतं. या तज्ज्ञांच्या समितीत एम्सचे डॉक्टर्स आणि कोविड १९ संदर्भातील टास्कफोर्समधील सदस्यही आहेत. या समुहाने अलीकडेच हा रिपोर्ट दिला त्यात सांगितलं की, मोठ्या संख्येने लसीकरण करण्यापेक्षा संवेदनशील आणि अतिजोखीम असलेल्या लोकांना कोरोनाची लस द्यावी.

तसेच ज्या जागी डेल्टा वेरिएंटमुळे वेगाने संक्रमण वाढत आहे. अशाठिकाणी कोविशील्ड लसीच्या डोसमधील अंतर कमी करण्यात यावं. आता कोविशील्डच्या दोन्ही डोसमधील अंतर कमीत कमी १२ आठवडे ठेवण्यात आलं आहे. इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ एपिडमॉलिजिस्टस आणि इंडियन असोसिएशन ऑफ प्रीवेंटिव एँड सोशल मेडिसिनच्या तज्ज्ञांनी हा रिपोर्ट बनवला आहे. त्यात म्हटलंय की, देशातील कोरोनाची सध्या आकडेवारी पाहता या काळात सर्वांसाठी कोरोना लसीकरण करण्यावर विचार करायला हवा. हा रिपोर्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोपवला आहे.

सर्व वयोगटातील लोक आणि मुलांचे लसीकरण करणं योग्य राहणार नाही आणि ते परवडणारं नाही. अनियोजित लसीकरणामुळे म्यूटेंट वेरिएंटस वाढू शकतो. त्यामुळे जे लोक कोरोनातून बरे झालेत त्यांचे लसीकरण करण्याची आता काही आवश्यकता नाही. सर्वांना लस देण्यानं काही साध्य होणार नाही. विशेष म्हणजे महामारीच्या संकटात लसीची उपलब्धता मर्यादित आहे. त्यामुळे मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी ज्या लोकांना धोका आहे अशा लोकांचे लसीकरण करायला हवं असं रिपोर्टमध्ये सांगितले आहे.

Read in English

Web Title: Corona Vaccination: Unplanned Vaccination May Promote Virus Mutation, Health Experts Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.