Corona Vaccination: मेड इन इंडिया 'कोवॅक्सिन'बद्दल मोठी बातमी! कोरोनाविरुद्धच्या लढ्याला 'बूस्ट' मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 12:28 PM2021-05-24T12:28:36+5:302021-05-24T12:29:00+5:30

Corona Vaccination: कोवॅक्सिनचा बूस्टर डोस लवकरच उपलब्ध होणार; तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू

Corona Vaccination trial of booster dose of covaxin bharat biotech niv icmr | Corona Vaccination: मेड इन इंडिया 'कोवॅक्सिन'बद्दल मोठी बातमी! कोरोनाविरुद्धच्या लढ्याला 'बूस्ट' मिळणार

Corona Vaccination: मेड इन इंडिया 'कोवॅक्सिन'बद्दल मोठी बातमी! कोरोनाविरुद्धच्या लढ्याला 'बूस्ट' मिळणार

Next

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत असल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा अडीच लाखांच्या खाली आला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला जात आहे. यासाठी भारत बायोटेक बूस्टर डोसची चाचणी सुरू करणार आहे.

जगात कोरोना पसरण्याआधी चीनच्या 'त्या' लॅबमध्ये काय घडलं?; धक्कादायक माहिती उघड

भारत बायोटेक आयसीएमआर आणि एनआयव्हीच्या सहकार्यानं कोवॅक्सिनच्या बूस्टर डोसची चाचणी घेणार आहे. कोवॅक्सिनच्या तिसऱ्या डोसच्या चाचणीला लवकरच सुरुवात होईल. या चाचणी दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत सहभागी झालेल्या काही स्वयंसेवकांना बूस्टर डोस देण्यात येईल. कोरोना प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी हा डोस रोगप्रतिकारशक्ती किती वाढवतो, याची चाचपणी भारत बायोटेककडून करण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या चाचणीत बूस्टर डोस ८१ टक्के प्रभावी ठरला आहे. 

तुम्ही 'या' तीन गोष्टी करता? मग तुम्हाला 'ब्लॅक फंगस'चा अधिक धोका

कोवॅक्सीनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष मार्चमध्ये समोर आले. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये लस ८१ टक्के प्रभावी ठरली. भारत बायोटेकनं देशभरात २५ हजार ८०० जणांवर याची चाचणी घेतली होती. आयसीएमआरच्या सहकार्यानं पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात चाचणी घेण्यात आली. कोरोनाची लागण न झालेल्यांवर ही लस ८१ टक्के प्रभावी ठरली होती.

Web Title: Corona Vaccination trial of booster dose of covaxin bharat biotech niv icmr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.