शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: कोविशील्डचा एक डोस घेतलेल्यांना लवकरच दिलासा? मोठा निर्णय होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 08:02 IST

Corona Vaccination: देशातील लसीकरण अभियानाला आणखी वेग देण्याची गरज; दुसरा डोस लवकर देण्याची आवश्यकता

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी हळूहळू ओसरू लागली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर झाली आहे. चीन आणि ब्रिटनमध्ये मात्र कोरोनानं थैमान घातलं आहे. त्यामुळे भारतानं वेगानं लसीकरण वेगानं पूर्ण करण्यावर भर द्यायला हवा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर कमी करायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

देशात राबवण्यात येत असलेल्या लसीकरण अभियानात ८० टक्के वाटा एकट्या कोविशील्डचा आहे. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांचं आहे. दिल्लीत ८७ टक्के लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे.  तर दोन्ही डोस घेतलेल्यांचं प्रमाण ४७ टक्के आहे. जोपर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचं प्रमाण वाढणार नाही, तोपर्यंत कोरोना संक्रमण आणि नव्या व्हेरिएंटचा धोका कायम राहील. हा धोका कमी करायचा असल्यास दुसरा डोस लवकर पूर्ण करायला हवा. त्यासाठी दोन डोसमधील अंतर ४ ते ६ आठवड्यांवर आणायला हवं, असं तज्ज्ञांना वाटतं.

चीन, ब्रिटनमध्ये कोरोनाचा स्फोटचीन आणि ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. नव्या व्हेरिएंटमुळे आणि कोरोना लसीमुळे तयार झालेल्या अँटिबॉडी घटल्यानं कोरोनाचा संसर्ग वाढल्याचं कोविड तज्ज्ञ डॉक्टर अंशुमान कुमार यांनी सांगितलं. भारतात आतापर्यंत केवळ ३० कोटी लोकांनाच कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर ७० कोटी एकच डोस मिळाला आहे. 

संपूर्ण देशात कोविशील्डचा ८० टक्के वापरसंपूर्ण देशात लसीकरण अभियानात कोविशील्ड लसीचा वापर सर्वाधिक झाला आहे. लसीकरण मोहिमेत कोविशील्डचा वाटा ८० टक्के आहे. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांचं आहे. त्यामुळे एका व्यक्तीचं संपूर्ण लसीकरण होण्यास किमान ८४ दिवसांचा कालावधी लागतो. आता हे अंतर कमी करण्याची वेळ आली आहे, असं मत सफदरजंगमधील कोविड तज्ज्ञ आणि कम्युनिटी मेडिसीनचे एचओडी डॉ. जुगल किशोर यांनी व्यक्त केलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस