शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccination : त्या व्यक्तींना तीन महिन्यांनी मिळेल कोरोनावरील लस, NEGVAC च्या शिफारशीला आरोग्य मंत्रालयाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 17:28 IST

Corona vaccination in India: NEGVACने कोरोनावरील लस देण्याबाबत काही महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या होत्या. त्या शिफारशींना आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

नवी दिल्ली- कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना तीन महिन्यांनंतर कोरोनावरील लस देण्याच्या नॅशनल एक्स्पर्ट्स ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन (NEGVAC) ने केलेल्या शिफारशीला आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. (Corona vaccination) त्यामुळे आता कोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना कोरोनामुक्तीनंतर ९० दिवसांनी कोरोनावरील लस मिळणार आहे. (NEGVAC's recommendation approved by the Ministry of Health)

NEGVACने कोरोनावरील लस देण्याबाबत काही महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या होत्या. त्यामध्ये जर कुणाला कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर अशी व्यक्ती बरी झाल्यानंतर तिला कोरोनावरील लस देण्यात यावी, या महत्त्वपूर्ण सल्ल्याचा समावेश होता. त्याला आता आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर स्तनपान करवणाऱ्या मातांनाही कोरोनावरील लस देण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच कोरोना लस घेण्यासाठी येणाऱ्या लोकांची अँटिजन चाचणी करण्यासही मनाई करण्यात आली आहे. 

 

या व्यक्तींना कोरोनावरील लस घेण्यासाठी पाहावी लागेल वाट

 - ज्या व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना रिकव्हरीच्या तीन महिन्यांनंतर कोरोनाविरोधातील लसीचा डोस दिला जाईल- ज्या कोरोनाबाधितांना अँटिबॉडी आणि प्लाझ्मा दिला गेला आहे. त्यांनासुद्धा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तीन महिन्यांनी कोरोनाच्या लसीचा डोस दिला जाईल- ज्या व्यक्तींना कोरोनाविरोधातील लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला असेल. त्यांनाही कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी कोरोनाविरोधातील लसीचा दुसरा डोस दिला जाईल. - ज्या व्यक्ती कुठल्याही गंभीर आजाराने पीडित आहेत. तसेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची किंवा आयसीयू केअरची गरज आहे. त्यांनासुद्धा चाते आठ आठवड्यांपर्यंत लसीसाठी वाट पाहावी लागेल.  - गर्भवती महिलांना कोरोनावरील लस देण्यासाठीच्या नियमांबाबत विचार केला जात आहे. एनटीएजीआयकडून याबाबत पुढील माहिती दिली जाईल.    

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य