शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccination: त्यामुळे कोव्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांना करता येणार नाही आंतरराष्ट्रीय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 06:39 IST

Corona vaccination News: लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी जगभरातील अनेक देशांनी प्रवासाचे धोरण जाहीर केले आहे. यामध्ये कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांचा समावेश करण्यात आलेला नाही. कोवॅक्सिनची निर्मिती भारत बायोटेकने केली आहे. 

 बंगळुरू : लसीकरण अभियानात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचा प्रामुख्याने वापर केला जात आहे. येत्या काळात आंतरराष्ट्रीय प्रवास करताना लस घेतली आहे का, ही बाब तपासली जाईल. या बाबतीत कोविशिल्डला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, कोव्हॅक्सिन घेतलेल्या भारतीय नागरिकांना आगामी काही महिने आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार नाही. लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी जगभरातील अनेक देशांनी प्रवासाचे धोरण जाहीर केले आहे. यामध्ये कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांचा समावेश करण्यात आलेला नाही. कोवॅक्सिनची निर्मिती भारत बायोटेकने केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या लसींच्या यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश नाही. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या कोविशिल्ड, मॉडर्ना, फायझर, ॲस्ट्रोझेनेका, सिनोफार्म/बीबीआयपी, जॉन्सन (अमेरिका आणि नेदरलँड) यांचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापराच्या यादीत केला आहे. मात्र, या यादीत अद्याप कोव्हॅक्सिनचा समावेश झालेला नाही. या यादीत स्वत:चा समावेश करून घेण्यासाठी भारत बायोटेकने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी मे-जूनमध्ये एक बैठक होईल, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली. भारत बायोटेकने कागदपत्रे जमा केल्यानंतर या यादीत कोवॅक्सिनचा समावेश करायचा की नाही, याचा विचार होईल.  यासाठी काही टप्पे आहेत. प्रत्येक टप्पा पूर्ण करण्यास काही आठवडे लागतात. याबद्दल भारत बायोटेककडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ­इंडियन व्हेरिएंट शब्द हटवासोशल मीडिया कंपन्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवरुन इंडियन व्हेरिएंट हा शब्द काढून टाकावा, असा आदेश केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिला आहे. तशा प्रकारचे पत्र सर्व सोशल मीडिया कंपन्यांना देण्यात आले आहे.या शब्दामुळे देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे यापुढे इंडियन व्हेरिएंट या शब्दाचा वापर करू नये असा आदेश माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य