Corona Vaccination: कोरोना लस घेतल्यानं देशात पहिल्या मृत्यूची नोंद; सरकारनं सांगितलं 'नेमकं' कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 13:02 IST2021-06-15T12:59:12+5:302021-06-15T13:02:58+5:30
Corona Vaccination: ५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान ६० लाख लोकांचं लसीकरण, पैकी एकाचा मृत्यू

Corona Vaccination: कोरोना लस घेतल्यानं देशात पहिल्या मृत्यूची नोंद; सरकारनं सांगितलं 'नेमकं' कारण
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा लाखाच्या खाली आला आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका असल्यानं लसीकरणाला गती देण्याची गरज आहे. मात्र काही व्यक्तींकडून जाणीवपूर्वक लसीकरणाबद्दल अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे. याबद्दल सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे.
काळजी घ्या! कोरोनाच्या नव्या रुपानं वाढवली चिंता; संशोधनातून समोर आला मोठा धोका
कोरोना लसीचे दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी सरकारनं नुकताच एक आढावा घेतला. ५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान लस घेतलेल्यांचा आढावा सरकारकडून घेण्यात आला. या कालावधीत लस घेतलेल्या लाखोंपैकी केवळ ३१ जणांच्या शरीरात ऍनाफिलेक्सिस तयार झाला. यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे या मृत्यूचा संबंध कोरोना लसीच्या दुष्परिणामांशी जोडला जाऊ शकतो. मात्र लाखो व्यक्तींमध्ये एकाच व्यक्तीच्या बाबतीत असा प्रकार घडला आहे.
गुड न्यूज! तब्बल 75 दिवसांनी पहिल्यांदाच सुखावणारी आकडेवारी, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट
५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान देशात ६० लाख लोकांनी कोरोना लस घेतली. यातील २८ जणांचा मृत्यू झाला. मात्र यातील बहुतांश मृत्यूंना लस कारणीभूत नाही. नऊ जणांच्या मृत्यूमागचं कारण अद्याप स्पष्ट व्हायचं आहे. लसीकरणाच्या दुष्परिणांचा अभ्यास करण्यासाठी सरकारनं एक राष्ट्रीय समिती स्थापन केली आहे. 'देशात कोरोना लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहे. लस दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला ऍनाफिलेक्सिस रिऍक्शन झाली. देशात आतापर्यंत कोट्यवधी लोकांना कोरोना लस घेतली आहे. त्यातील मोजक्या लोकांवर गंभीर साईड इफेक्ट्स दिसले आहेत. केवळ ३१ व्यक्तींनाच ऍनाफिलेक्सिस रिऍक्शन झाली. यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर इतरांवर उपचार झाले,' अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली.