शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
6
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
7
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
8
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
9
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
10
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
12
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
13
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
14
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
15
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
16
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
17
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
18
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
19
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
20
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : लस महाेत्सवाला अपेक्षित प्रतिसाद नाही, मात्र महाराष्ट्राची कामगिरी सरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 07:16 IST

Corona Vaccination : पंतप्रधान माेदी यांनी लस महाेत्सव जाहीर करताना दरराेज काेराेनाचे ५० लाख डाेस देण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले हाेते. मात्र, लस महाेत्सवाच्या एकाही दिवशी हे लक्ष्य गाठता आलेले नसल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : काेराेनाविराेधात लढा अधिक बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी माेठ्या महत्त्वाकांक्षेने ११ ते १४ एप्रिल या कालावधीत लस महाेत्सव जाहीर केला हाेता. मात्र, त्यातून अपेक्षेनुसार लसीकरण झालेले नसल्याचे निष्पन्न झाले असून, तब्बल ६५ हजार केंद्रांमध्ये लसींचा तुटवडा झाल्याचे आढळून आले आहे. अशा परिस्थितीही महाराष्ट्राची कामगिरी चांगली असून आतापर्यंत देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रातच झाले आहे.पंतप्रधान माेदी यांनी लस महाेत्सव जाहीर करताना दरराेज काेराेनाचे ५० लाख डाेस देण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले हाेते. मात्र, लस महाेत्सवाच्या एकाही दिवशी हे लक्ष्य गाठता आलेले नसल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. सर्वाधिक ४० लाख डाेस १२ एप्रिलला देण्यात आले, तर १३ एप्रिलला सर्वांत कमी २६.५ लाख डाेस देण्यात आले, तर ११ एप्रिलला २९.३ लाख आणि १४ एप्रिलला ३३.१ लाख डाेस देण्यात आले. आतापर्यंत २ एप्रिलला ४२.७० लाख डाेस देण्याचा उच्चांक आहे. ‘स्पुतनिक-व्ही’साठी जाेरदार प्रयत्नकेंद्र सरकारकडून लसीचा दुसरा डाेस ६ ते ८ आठवड्यांनी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. त्यामागे लसींचा तुडवडा असल्याचे बाेलले जात आहे. प्रशासनाकडून लवकरात लवकर ‘स्पुतनिक-व्ही’ लसीच्या आयातीसाठी जाेरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. 

महाराष्ट्राची कामगिरी सरसच-    उपलब्ध आकडेवारीनुसार, भाजपशासित राज्यांमध्येही कमी लसीकरण झाल्याचे दिसून आले आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, तसेच पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये लसींचा गंभीर तुटवडा दिसून आला. -    आठवडाभरापूर्वीच लसींची निर्यात थांबविल्यानंतरही लसींचा तुटवडा कशामुळे निर्माण हाेत आहे, या प्रश्नाने प्रशासनाला भंडावून साेडले आहे. -    अशा स्थितीत महाराष्ट्राने १४ एप्रिलला लसीकरणात इतर तीन दिवसाच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. 

कामगिरीमहाराष्ट्र- १२ लाखउत्तर प्रदेश-१५.३ लाखगुजरात-८.१ लाखपश्चिम बंगाल-५.४९ लाख

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस