Corona vaccination: लस घ्या, फोटो शेअर करा आणि सरकारकडून पाच हजार रुपये मिळवा, असा आहे नियम 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 07:24 PM2021-05-21T19:24:36+5:302021-05-21T19:27:11+5:30

Corona vaccination in India: केंद्र सरकारने लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी खास योजना आखली आहे. या योजनेमध्ये जर तुम्ही लस घेतानाचा फोटो शेअर केला तर पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळणार आहे.

Corona vaccination: Get vaccinated, share photos and get Rs 5,000 from the government | Corona vaccination: लस घ्या, फोटो शेअर करा आणि सरकारकडून पाच हजार रुपये मिळवा, असा आहे नियम 

Corona vaccination: लस घ्या, फोटो शेअर करा आणि सरकारकडून पाच हजार रुपये मिळवा, असा आहे नियम 

Next

नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंजत असतानाच आता देशामध्ये लसीकरणाची गतीही वाढवण्यावर भर दिला जात आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (Corona vaccination in India) अशा परिस्थितीत केंद्र सरकारने लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी खास योजना आखली आहे. या योजनेमध्ये जर तुम्ही लस घेतानाचा फोटो शेअर केला तर पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळणार आहे. (Get vaccinated, share photos and get Rs 5,000 from the government)

सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती दिली गेली आहे. तुम्ही लाखो लोकांना कोरोनावरील लस घेण्यासाठी प्रेरित करून पाच हजार रुपयांचे बक्षीस जिंकू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचा किंवा तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा फोटो शेअर करावा लागेल, त्यामाध्यमातून तुम्ही हे रोख बक्षीस मिळवू शकता. 

यासाठीचा नियम अगदी सोपा आहे. त्यासाठी तुम्हाला सरकारचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या www.mygov.in वर जावे लागेल. तसेच तिथे तुमचा लस घेतानाचा फोटो शेअर करावा लागेल. या फोटोसह तुम्हाला एक टॅगलानही लिहावी लागेल. ही टॅगलाइन आकर्षक आणि लक्षवेधी असली पाहिजे. त्या माध्यमातूनच तुम्हाला हे रोख बक्षीस मिळण्याची शक्यता वाढेल.  

 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लसींच्या तुटवड्यामुळे देशातील लसीकरणाच्या गतीला काहीसा ब्रेक लागला असला तरी लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. तसेच देशात १८ कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. 

Web Title: Corona vaccination: Get vaccinated, share photos and get Rs 5,000 from the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.