शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नका, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत; पंतप्रधानांना अहवाल सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 07:12 IST

Corona Vaccination: अपुऱ्या लसीकरणामुळे विषाणूचे आणखी नवे प्रकार उत्पन्न होऊ शकतात, असा इशाराही डॉक्टरांनी दिला.

नवी दिल्ली : कोरोनाची बाधा झालेल्या व त्यातून बरे झालेल्यांना लस देण्याची आवश्यकता नाही, असे सार्वजनिक आरोग्य या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी पंतप्रधानांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे. अपुऱ्या लसीकरणामुळे विषाणूचे आणखी नवे प्रकार उत्पन्न होऊ शकतात, असा इशाराही डॉक्टरांनी दिला. टास्क फोर्समधील सदस्य, एम्सचे डॉक्टर, इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इं. असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन, असो. ऑफ पिडेमिऑलॉजिस्टसच्या तज्ज्ञांनी अहवाल बनविला आहे.

तरुणांना लस देणे किमतीच्या दृष्टीने न परवडणारेडॉक्टरांनी म्हटले आहे की, लसींचा तुटवडा पाहता वयोवृद्ध, स्थूलपणा वा एकाहून अधिक सहव्याधींनी ग्रस्त असलेल्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तरुणांना लस देणे किमतीच्या दृष्टीने परवडणारे नाही. डेल्टा प्रकाराचा संसर्ग असलेल्या भागात कोविशिल्डच्या २ डोसचे १२ आठवड्यांचे अंतर घटवण्याचा विचार करावा.

आवश्यकता असलेल्यांनाच लस द्या- लहान मुलांसह सर्वांना लस देण्याऐवजी ज्यांना खरंच आवश्यकता आहे त्यांनाच ही लस देण्यात यावी. - पोलिओ किंवा इतर लसी देण्याच्या मोहिमांमधील अनुभव कोरोना लसीकरण मोहीम राबविताना उपयोगी ठरतील, असेही डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केलेल्या एका अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या