शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

Corona Vaccination : लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीच्या चाचण्यांना दिल्लीतील एम्समध्ये प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 5:54 AM

Corona Vaccination : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची शक्यता नाही, असा दावा डॉ. संजय राय यांनी केला.

- हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : फायझरने लहान मुलांसाठी कोरोना लस शोधली असली तरी भारतामध्ये २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांकरिता कोव्हॅक्सिन लसीच्या चाचण्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरू झाल्या आहेत. एम्समधील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. संजय राय यांच्या नेतृत्वाखाली या चाचण्या करण्यात येत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची शक्यता नाही, असा दावा डॉ. संजय राय यांनी केला.भारत बायोटेक ही कंपनीने तयार केलेली कोव्हॅक्सिन लस १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना आधीपासूनच देण्यात येत आहे. डॉ. संजय राय यांनी लोकमतला सांगितले की, लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचण्या आम्ही येत्या तीन महिन्यांत पूर्ण करणार आहोत. लहान मुलांकरिता कोव्हॅ्रक्सिन लसीच्या मानवी चाचण्या करण्यास औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकला गेल्या महिन्यात परवानगी दिली होती. भारत बायोटेक ५६८ मुलांवर या लसीच्या चाचण्या सध्या करत आहे. त्या यशस्वी झाल्यास ही लहान मुलांसाठी असलेली पहिली स्वदेशी लस ठरणार आहे. तसेच झायडस कॅडिला व बायोलॉजिकल ई या कंपन्यादेखील १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना लस बनवत असून, तिच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. डॉ. संजय राय यांनी सांगितले की, लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन व पालकांना विश्वासात घेऊन या चाचण्या सुरू आहेत. याआधी १८ वर्षे वयापुढील लोकांसाठी बनविलेल्या कोव्हॅक्सिन या पहिल्या स्वदेशी कोरोना लसीच्या चाचण्या डॉ. संजय राय यांच्या नेतृत्वाखालीच पार पाडण्यात आल्या होत्या. कोरोना साथीच्या आणखी काही लाटा येऊ शकतात. देशामध्ये कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेमध्ये प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत संसर्ग झालेल्या लहान मुलांची संख्या पाहता मुलांना तिसऱ्या लाटेपासून मोठा धोका आहे असे म्हणता येणार नाही, असे मत डॉ. गगनदीप कांग यांच्यासह काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

विषाणू, संसर्गजन्य रोगांच्या तज्ज्ञांचेच मत महत्त्वाचे - एम्समधील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. संजय राय म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत विशेषत: लहान मुलांना संसर्गाचा मोठा धोका आहे, असा काही स्वयंघोषित तज्ज्ञ गाजावाजा करून भीती निर्माण करत आहेत. मात्र तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा मोठा धोका असल्याचा निष्कर्ष अद्याप कोणत्याही अभ्यासातून काढण्यात आलेला नाही. 

- अशा संवेदनशील विषयात सार्वजनिक आरोग्य या विषयाचे तज्ज्ञ, विषाणूतज्ज्ञ व संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ यांचेच मत प्रमाण मानले पाहिजे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या