शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

Corona Vaccination: आता कोरोना लसीसाठी ६ नाही, ९ महिने थांबावं लागणार?; 'त्या' व्यक्तींसाठी मोठा निर्णय होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 12:33 PM

Corona Vaccination: कोरोना लसीकरणाच्या धोरणात लवकरच बदल होण्याची शक्यता; काही दिवसांत मोठा निर्णय अपेक्षित

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा काही दिवसांपासून कमी होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला दररोज कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र आता हा आकडा ३ लाखांच्या खाली आला आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. कोरोना लसीकरणाच्या धोरणातही सातत्यानं बदल होत आहेत. कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलाय आता यानंतर आणखी एक मोठा निर्णय अपेक्षित आहे.कोरोनाचा कहर: ३.५ कोटी श्रमिकांनी वर्षभरात PF खात्यातून काढले १.२५ लाख कोटी रूपयेएखाद्या व्यक्तीनं कोरोनावर मात केल्यानंतर त्याच्या शरीरात अँटिबॉडी तयार होतात. या अँटिबॉडी पुढील काही महिने त्याचं कोरोनापासून रक्षण करतात. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना ९ महिन्यांनंतर लसीचा डोस देण्याचा निर्णय लवकरच होऊ शकतो. नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन ऍडमिनिस्ट्रेशनकडून (NEGVAC) याबद्दलचा निर्णय घेण्याचा शक्यता आहे. कोरोनामुक्त झालेल्यांना ९ महिन्यांनंतर लस देण्यात यावी अशी शिफारस या गटानं केली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांना ६ महिन्यांनंतर लस देण्याचा निर्णय नुकताच घेतला गेला होता. आता त्यात बदल होण्याची शक्यता आहे.लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला २ कोटींचा टप्पा; कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसरकोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी पुन्हा लागण होण्याचा दर ४.५ टक्के इतका होता. यासाठीचं अंतर १०२ दिवस इतकं होतं. मात्र काही देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एकदा कोरोनावर मात केल्यानंतर निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती ६ महिने टिकते, अशी माहिती नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन ऍडमिनिस्ट्रेशनं दिली. कोरोनावर मात केलेल्यांना सध्या लसीसाठी ६ महिने वाट पाहावी लागत आहे. मात्र आता हा कालावधी ९ महिन्यांपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या