शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 'या' लोकांनाच 28 दिवसांच्या गॅपनंतरही घेता येईल Covishieldचा दुसरा डोस; जाणून घ्या, सरकारची नवी गाइडलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 10:10 IST

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने आता सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कोविड-19 च्या लशीसाठी आवश्यक फोटो आयडीत यूनीक डिसॅबिलिटी आयडी कार्ड (UDID) चाही समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवी गाइडलाईन जारी केली आहे. ज्याला परदेशात जायचे आहे त्याला पहिल्या डोसच्या 28 दिवसांनंतर कधीही कोविशिल्डचा दुसरा डोस घेता येऊ शकतो. सर्वसामान्यपणे सरकारने कोविशील्ड लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचा गॅप ठेवला आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवी गाइडलाईन जारी केली आहे. यानुसार, ज्याला परदेशात जायचे आहे त्याला पहिल्या डोसच्या 28 दिवसांनंतर कधीही कोविशिल्डचा दुसरा डोस घेता येऊ शकतो. मात्र, सर्वसामान्यपणे सरकारने कोविशील्ड लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचा गॅप ठेवला आहे.

गाइडलाईनमध्ये म्हणण्यात आले आहे, की परदेशात जाण्यासाठी केवळ कोविशील्ड लस घेतलेल्यांनाच व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट देण्यात येईल. या सर्टिफिकेटवर पासपोर्ट नंबरचाही उल्लेख असेल. यासाठी भारताची दुसरी लस कोव्हॅक्सिन क्वालिफाय करत नाही.

CoronaVaccine : Corbevax असू शकते देशातील सर्वात स्वस्त लस, केंद्र सरकारनं केली 30 कोटी डोसची प्री-बुकिंग

केवळ विशेष श्रेणीतील लोकांनाच सूट -ही गाईडलाईन केवळ, 18 वर्षांवरील आणि 31 ऑगस्टपर्यंत परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठीच जारी करण्यात आलेली आहे. यात शिक्षणासाठी परदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी परदेशात जाणारे लोक, टोकियो ओलिम्पिक्स गेम्समध्ये सहभागी असलेले विद्यार्थी आणि त्यांच्या सोबत जाणाऱ्या स्टाफचा समावेश असेल.

सर्वसाधारणपणे कोविशील्डच्या दुसऱ्या डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांच्या गॅपचा नियम आहे. मात्र, या श्रेणीत परदेशात जाणाऱ्यांना लवकरही दुसरा डोस घेता येऊ शकतो. पहिला डोस घेऊन 28 दिवस झाले आहेत की नाही, यावर अथॉरिटी लक्ष ठेवेल. यासंदर्भात लवकरच कोवीन प्लॅटफॉर्मवरही विशेष व्यवस्था बघायला मिळेल.

Corona Virus : कोरोनावर मात केलेल्यांसाठी लशीचा एकच डोस पुरेसा; BHUच्या वैज्ञानिकांचा मोठा दावा, PM मोदींना लिहिलं पत्र

लसीकरणासाठी आता दिव्यांग फोटो ID ही चालणार - केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने आता सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कोविड-19 च्या लशीसाठी आवश्यक फोटो आयडीत यूनीक डिसॅबिलिटी आयडी कार्ड (UDID) चाही समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत. लशीसाठी कुठल्याही पद्धतीने रजिस्‍ट्रेशन करण्यापूर्वी ओळखपत्र दिखवावे लागते. अशात अता दिव्यांग व्यक्ती यूडीआयडी दाखवून लसीकरणाचा लाभ घेऊ शकतात. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCentral Governmentकेंद्र सरकार