शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

Corona Vaccination: ४० वर्षे वयावरील नागरिकांना बूस्टर डोस दिला जाण्याची शक्यता, इन्साकॉगची केंद्र सरकारला शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 8:24 AM

Corona Vaccination: ४० वर्षे व त्यापुढील वयोगटाच्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्याचा विचार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देशभरातील प्रयोगशाळांच्या इन्साकॉग नेटवर्कच्या साप्ताहिक वार्तापत्रात देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : ४० वर्षे व त्यापुढील वयोगटाच्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्याचा विचार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देशभरातील प्रयोगशाळांच्या इन्साकॉग नेटवर्कच्या साप्ताहिक वार्तापत्रात देण्यात आली आहे. अशा बूस्टर डोससंदर्भातील शिफारस इन्साकॉगने केंद्र सरकारला केली आहे.

ज्यांनी आजवर लस घेतलेली नाही, त्यांना ओमायक्राॅनच्या संसर्गाचा धोका आहे याची जाणीवही इन्साकॉगने करून दिली आहे. या संस्थेने म्हटले आहे की, सध्याच्या लसींमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज् या नव्या विषाणूला निष्प्रभ करण्यासाठी पुरेशा ठरणार नाहीत अशी शक्यता आहे. मात्र नव्या विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गाची तीव्रता मात्र पूर्वीच्या विषाणूंच्या तुलनेत कमी असू शकेल.

ओमायक्रॉनमुळे सर्वाधिक धोका ४० वर्षे व त्यावरील वयोगटाच्या लोकांना असल्याने त्यांना बूस्टर डोस देण्यात यावेत, असे इन्साकॉगचे मत आहे. या नव्या विषाणूचे अस्तित्व लवकर शोधून काढण्यासाठी जिनोमिक सिक्वेंसिंग अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणे शक्य होईल. 

जोखमीच्या देशांतून आलेल्यांपैकी१८ जण बाधित- कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची जोखीम असलेल्या देशांमधून भारतात आजवर आलेल्या १६ हजार प्रवाशांपैकी १८ जण कोरोनाबाधित आहेत. _ या सर्व प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली. - ते म्हणाले, ओमायक्राॅनचा विषाणू शोधण्यासाठी या प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यावरून विरोधकांनी सुरू केलेले राजकारण आता थांबवावे, असेही आवाहन मांडवीय यांनी केले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत