Corona Vaccination: याला काय म्हणावं! नर्स राहिली बसून; अधिकाऱ्यानं सरपंचाला लस दिली टोचून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 12:27 PM2021-04-12T12:27:33+5:302021-04-12T12:32:53+5:30

Corona Vaccination: नर्स उपस्थित असताना अधिकाऱ्यानं लस टोचण्याची गरज? उलटसुलट चर्चांना उधाण

Corona Vaccination bdo vaccinated sarpanch during corona drive in bihar in front of nurse | Corona Vaccination: याला काय म्हणावं! नर्स राहिली बसून; अधिकाऱ्यानं सरपंचाला लस दिली टोचून

Corona Vaccination: याला काय म्हणावं! नर्स राहिली बसून; अधिकाऱ्यानं सरपंचाला लस दिली टोचून

Next

पश्चिम चंपारण्य: देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोना लसीकरणाला वेग देण्याचं काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. त्यासाठी कालपालून लसीकरण उत्सवास सुरुवात झाली. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्य कर्मचारी आघाडीवर राहून लढत आहेत. त्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनदेखील सहकार्य मिळत आहे. मात्र बिहारमध्ये आरोग्य कर्मचारी उपस्थित असताना एका अधिकाऱ्यानं कोरोनाची लस टोचल्याची घटना घडली आहे.

नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 1,68,912 नवे रुग्ण, एक कोटीचा टप्पा केला पार

पश्चिम चंपारण्यातल्या बेतियामधल्या चनपटियाचे गट विकास अधिकारी दिनबंधू दिवाकर यांनी एका सरपंचाला कोरोना लस टोचली. विभागातील कोरोना लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी दिवाकर निघाले होते. त्यावेळी अवरैयाच्या ग्राम पंचायतीत लसीकरणाचं काम सुरू होतं. यावेळी सरपंचांनी दिवाकर यांच्या हातून लस टोचून घेण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर दिवाकर यांनी सरपंचाला लस टोचली.

महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती, बेड नसल्याने रुग्णाला खुर्चीवर बसवून द्यावा लागला ऑक्सिजन 

दिवाकर लस टोचत असताना तिथे नर्स उपस्थित होती. मात्र सरपंचांनी दिवाकर यांच्याकडे लस टोचून देण्याचा आग्रह धरल्यानं आणि दिवाकर यांनीदेखील नकार दिल्यानं नर्सचादेखील नाईलाज झाला. दिनबंधू दिवाकर यांनी बीडीओ म्हणून पदभार हाती घेण्यापूर्वी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केल्याचं सांगितलं जातं. मात्र लोकसेवेत रस असल्यानं त्यांनी बीडीओ म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 

दिवाकर लस टोचत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोरोना लस देण्याची जबाबदारी नेमकी कोणावर आहे, नर्स उपस्थित असताना अधिकाऱ्यांनी लस टोचण्याची आवश्यकता आहे का, अधिकाऱ्यांनी कोरोना लस देण्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

Web Title: Corona Vaccination bdo vaccinated sarpanch during corona drive in bihar in front of nurse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.