शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

CoronaVirus News: मोदी सरकारनं केलेली 'ती' घोषणा अंगाशी येणार? भाजपशासित राज्यांनाही केले हात वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 13:15 IST

CoronaVirus News: देशातील लसीकरण मोहिमेला ब्रेक; अनेक राज्यांत लसींचा तुटवडा

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या आठवड्याभरपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे देशाच्या अनेक राज्यांमधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. तर दुसऱ्या बाजूला कोरोना लसीकरण मोहिमेतही अनेक अडथळे येत आहेत. केंद्र सरकारनं १ मेपासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र पुरेशा तयारीअभावी केलेली ही घोषणा आता कागदावरच राहण्याची दाट शक्यता आहे. राज्यात कोरोना लसींचा मोठा तुटवडा; ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाआधी केंद्र सरकार लस उत्पादकांकडून १०० टक्के साठा खरेदी करायचं. त्यानंतर सर्व राज्यांमध्ये लसींचं वाटप केलं जायचं. आता मात्र केंद्र सरकार लस उत्पादकांकडून ५० टक्के साठा खरेदी करत आहे. उर्वरित ५० टक्के साठा उत्पादक राज्य सरकारं आणि खासगी रुग्णालयांना विकू शकतात. मात्र अनेक राज्यांना लस उत्पादकांकडून पुरेसा साठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे अनेक राज्यांनी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यास असमर्थतता दर्शवली आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांचादेखील समावेश आहे. ...'त्या' व्यक्तींना कोरोना लसीचा एकच डोस पुरेसा; दुसऱ्या डोसची गरजच नाहीलसींचा तुटवडा जाणवत असल्यानं दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, छत्तीसगडमध्ये १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू होणार नाही. याशिवाय मध्य प्रदेश, बिहार, गुजरातमध्येही १ मेपासून १८ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण सुरू होणार नाही. कोरोना लसींचा साठा मागवला आहे. मात्र अद्याप तो आलाच नसल्यानं लसीकरण शक्य नसल्याची माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. गुजरात, बिहारमध्येही उद्यापासून लसीकरण सुरू होणार नाही. गुजरातमध्ये १५ मेपासून लसीकरण सुरू होणार आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातMaharashtraमहाराष्ट्रMadhya Pradeshमध्य प्रदेशBiharबिहार