Corona Third Wave: अखेर देशात तिसरी लाट धडकलीच; २४ तासांत ३७ हजारांहून अधिक रूग्णांची भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 05:53 IST2022-01-05T05:53:15+5:302022-01-05T05:53:24+5:30
Corona Third Wave, Omicron: महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, केरळ व गुजरात ही राज्ये ‘ओमायक्राॅन’ची सुपर स्प्रेडर आहेत. रुग्णांत ‘ओमायक्राॅन’बाधितांची संख्या १८९२ आहे.

Corona Third Wave: अखेर देशात तिसरी लाट धडकलीच; २४ तासांत ३७ हजारांहून अधिक रूग्णांची भर
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांमध्ये काेराेनाचे ३७ हजार ३७९ नवे रुग्ण आढळले. ‘ओमायक्राॅन’ व्हेरिएंटमुळे भारतात तिसरी लाट सुरू झाल्याचे काेविड टास्क फाेर्सचे प्रमुख डाॅ. एन. के. अराेरा यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, केरळ व गुजरात ही राज्ये ‘ओमायक्राॅन’ची सुपर स्प्रेडर आहेत.
रुग्णांत ‘ओमायक्राॅन’बाधितांची संख्या १८९२ आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने दिल्ली, बिहार, गोवा, पंजाबसह अनेक राज्यांनी निर्बंध लावले असून पुन्हा लाॅकडाऊनच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
nउंदरांपासून ओमायक्राॅनचा संसर्ग : चीनच्या संशाेधकांनी ओमायक्राॅनबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. ओमायक्राॅन व्हेरिएंट
उंदरांपासून म्युटेट झाल्यानंतर माणसांना बाधित केले आहे. माणसातून उंदरांमध्ये व पुन्हा माणसांमध्ये असा विषाणूचा प्रवास
आहे.
नवा व्हेरिएंट आढळला
ओमायक्राॅनपेक्षा जास्त क्षमतेचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. त्याचे तात्पुरते नाव ‘आयएचयू’ असून, फ्रान्समध्ये त्याचा रुग्ण आढळला आहे. ओमायक्राॅनपेक्षाही हा जास्त वेगाने पसरू शकताे.
अमेरिकेत १० लाखांहून अधिक नवे रुग्ण
अमेरिकेत काेराेना रुग्णांची आतापर्यंतची उच्चांकी संख्या नाेंदविण्यात आली. अमेरिकेत २४ तासांमध्ये १०.४२ लाख रुग्ण आढळले. अमेरिकेत १ जानेवारीला १.६१ लाख, ३ तारखेला १० लाखांहून अधिक रुग्णांची नाेंद झाली.फ्रान्समध्ये एकाच दिवसात ५८ हजार, तर ब्रिटनमध्ये १.३७ लाख रुग्ण आढळले.