शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Corona in Kerala: केरळमध्ये पसरतोय कोरोना; देशाच्या रुग्णांत ६८% वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 08:00 IST

Corona in Kerala: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण रुग्णसंख्येत गुरुवारी एकट्या केरळचा वाटा होता ६८ टक्के. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडील माहितीनुसार बुधवारी राज्यात नव्या ३१,४४५ रुग्णांची नोंद झाली.

थिरूवनंतपूरम : देशात गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या ४६,१६४ रुग्णांची नोंद झाली तर ६०७ जणांचा मृत्यू झाला. देशात रोज २० हजार रुग्णांची वाढ होत असून त्याचे कारण काही राज्यांत विशेषत: केरळमध्ये कोविड-१९ ने घेतलेली उसळी हे आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण रुग्णसंख्येत गुरुवारी एकट्या केरळचा वाटा होता ६८ टक्के. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडील माहितीनुसार बुधवारी राज्यात नव्या ३१,४४५ रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन महिन्यांतील ही सर्वोच्च रुग्ण संख्या होती. रुग्णसंख्येचासर्वाधिक फटका एर्नाकुलम (४,०४८ रुग्ण) आणि थ्रिसूर (३,८६५ रुग्ण) जिल्ह्याला बसला. 

सणासुदीत काळजी घ्या : केंद्राचे आवाहन “दुसरी लाट अजून विरलेली नाही. आम्हाला पुढील दोन महिने खूप सावध राहावे लागेल, राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा आणि अपेक्षित लक्ष्य गाठावे, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले.सणासुदीच्या दिवसांत राज्यांनी कोरोना प्रतिबंधक उपायांचे कठोरपालन करून घ्यावे, असे राज्यांना सांगण्यात आल्याचेही ते म्हणाले.केरळमध्ये सिरोचा प्रभाव फारच कमी झाल्यापासून आम्हाला लवकरात लवकर बाधित झालेले शोधून त्यांना विलगीकरणात ठेवायचे आहे, असे राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या.

ओणमनंतर वाढकेरळमध्ये चाचण्या सकारात्मक निघण्याचा दर १९.०३ टक्के असून तो गेल्या तीन महिन्यांतील उच्चांक आहे. या वाढीला कारण ठरला तो गेल्या आठवड्यात साजरा झालेला ओणम सण. ओणमनंतर रुग्णसंख्या वाढेल अशी राज्याची अपेक्षा आहे. चाचण्या आणि लसीकरण वाढवण्याची विशेष मोहीम राबवली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळ