धक्कादायक! करवाचौथचा उपवास करता आला नाही म्हणून कोरोनाग्रस्त महिलेने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 03:17 PM2020-11-05T15:17:42+5:302020-11-05T15:25:57+5:30

Corona Positive Woman Suicide News : करवाचौथचा उपवास करता आला नाही म्हणून एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. 

corona positive woman jumps to death from saifai medical college on karva chauth | धक्कादायक! करवाचौथचा उपवास करता आला नाही म्हणून कोरोनाग्रस्त महिलेने उचललं टोकाचं पाऊल

धक्कादायक! करवाचौथचा उपवास करता आला नाही म्हणून कोरोनाग्रस्त महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 83,64,086 वर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 50,209 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 704 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील विविध रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. करवाचौथचा उपवास करता आला नाही म्हणून एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. 

कोरोनाग्रस्त महिलेने रुग्णालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. उत्तर प्रदेशच्या इटावा येथील सैफई वैद्यकीय विद्यापीठातील कोविड वॉर्डमध्ये ही घटना घडली. घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तिला कोविड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. करवाचौथचा उपवास करता आला नाही म्हणून महिलेने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. 

मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी असलेली ही महिला मेंदूच्या आजाराने ग्रस्त होती. त्यामुळे तिला 27 ऑक्टोबरला न्यूरो-सर्जरी विभागात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र याच दरम्यान, 29 ऑक्टोबरला तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तिला रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील आयसोलेशन वॉर्डमध्ये हलविण्यात आलं होतं. याच दरम्यान महिलेने उडी मारून आत्महत्या केली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

प्रियकरासाठी करावाचौथचं व्रत ठेवणं पडलं महागात, कुटुंबीयांनी केली बेदम मारहाण; Video व्हायरल

पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवाचौथ हे व्रत केलं जातं. मात्र लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला हे व्रत करणं चांगलंच महागात पडलं आहे. तरुणीने करवाचौथ व्रत केलं म्हणून कुटुंबीयांनी तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांपासून जीव वाचवत तरुणीने पोलिसांत धाव घेतली मात्र पोलीस ठाण्यातही तिच्या नातेवाईकांनी जोरदार राडा करत गोंधळ घातला आणि पोलिसांसमोरच तरुणाला चोप दिल्याची माहिती मिळत आहे. लखनऊमध्ये ही घटना घडली असून याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. 

Web Title: corona positive woman jumps to death from saifai medical college on karva chauth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.