शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! "माझी हत्या होऊ शकते", कोरोनाग्रस्त पत्रकाराच्या आत्महत्येनंतर 'ते' चॅट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 14:58 IST

पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येने सात लाखांचा टप्पा पार केला आहे. पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये एका 37 वर्षीय कोरोनाग्रस्त पत्रकाराच्या मृत्यूवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. याबाबत आता एक धक्कादायक माहिती आता समोर आली असून आरोग्य मंत्रालयाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

तरुण सिसोदिया असं पत्रकाराचं नाव असून काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र सोमवारी त्यांनी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, तरुण सिसोदिया यांनी रुग्णालयात दाखल असताना तेथील उपचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप देखील केला होता. तसेच आरोग्य मंत्रालयाकडेही यासंबंधी तक्रार केली होती. 

तरुण यांच्या आत्महत्येनंतर आता सोशल मीडियावरील त्यांचं एक चॅट जोरदार व्हायरल होत आहे. एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील चॅट मेसेज व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तरुण सिसोदिया यांनी आपली हत्या होईल अशी भीती व्यक्त केली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आरोग्य मंत्रालयाने रुग्णालयाला याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही याबाबत एक ट्विट केलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून जर कोणी यामध्ये दोषी आढळलं तर कठोर कारवाई केली जाईल असं देखील हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल एक कोटीच्या वर गेली आहे. कोरोनाच्या आकडेवारीत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. देशात देखील कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी पुन्हा एकदा साधला मोदी सरकारवर निशाणा, 'हे' प्रश्न विचारत केला हल्लाबोल

CoronaVirus News : मुंबई, दिल्लीतून आनंदाची बातमी पण देशातील 'या' राज्यांनी वाढवली चिंता

कामासाठी काय पण! लग्न मंडपातच नवरीने घेतला लॅपटॉप अन्...; Video तुफान व्हायरल

Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! गुंड गोळीबार करत होते तरी पोलिसाने केला दीड किमीपर्यंत पाठलाग

India China Faceoff : मोदी सरकार चीनविरोधात अ‍ॅक्शन मोडमध्ये, 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

CoronaVirus News : पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका?; WHO ने दिली महत्त्वाची माहिती

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdelhiदिल्ली