दिल्लीत कोरोना संक्रमण वाढले; यलो अलर्ट जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 05:51 IST2021-12-29T05:50:43+5:302021-12-29T05:51:00+5:30
Corona : चित्रपटगृहे, थिएटर, मल्टिप्लेक्स, बॅक्वेट, क्रीडा व सर्वप्रकारच्या धार्मिक आयोजनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. बाजारपेठा व शॉपिंग मॉलच्या दुकानांसाठी सम-विषम तत्त्व लागू करण्यात आले आहे.

दिल्लीत कोरोना संक्रमण वाढले; यलो अलर्ट जारी
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे अनेक प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. चित्रपटगृहे, थिएटर, मल्टिप्लेक्स, बॅक्वेट, क्रीडा व सर्वप्रकारच्या धार्मिक आयोजनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. बाजारपेठा व शॉपिंग मॉलच्या दुकानांसाठी सम-विषम तत्त्व लागू करण्यात आले आहे.
दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ताज्या आदेशात म्हटले आहे की, दिल्लीत कोरोना रुग्ण वाढत आहेत. मागील दोन दिवसांत संक्रमणाचा दर ०.५ टक्क्यांवर गेला आहे. याबरोबरच ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे यलो-१ श्रेणीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मेट्रो व आंतरराज्यीय बसमध्ये निर्धारित क्षमतेच्या ५० टक्के लोकच प्रवास करू शकणार आहेत. प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्याची परवानगी नाही.
युराेपमध्ये स्थिती गंभीर
फ्रान्समध्ये एकाच दिवसात १ लाखांहून जास्त रुग्ण आढळल्यामुळे सरकारने कठाेर निर्बंध लागू केले आहेत. ब्रिटननंतर फ्रान्समध्ये ओमायक्राॅनचा संसर्ग वाढत आहे. डेन्मार्कमध्येही दरराेज १५ हजार रुग्ण आढळत आहेत. जर्मनीमध्येही सरकारने निर्बंध लागू केले आहेत. यविराेधात नागरिक रस्त्यांवर उतरले हाेते.
- नव्या निर्बंधांमध्ये सरकारी व खासगी काऱ्यालयांतील
कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत मर्यादित
करण्यात आली आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना घरून काम करावे लागेल.