Corona in india: पंतप्रधान नरेंद्र मोदींची अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक, कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 18:56 IST2022-01-09T18:53:55+5:302022-01-09T18:56:45+5:30
रविवारी देशात कोरोना विषाणूचे सुमारे 1.6 लाख नवीन रुग्ण आढळले, हा आकडा गेल्या 224 दिवसांतील सर्वाधिक आहे.

Corona in india: पंतप्रधान नरेंद्र मोदींची अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक, कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशातील कोरोनाव्हायरसमुळे उद्भवलेल्या सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. पीएम मोदींनी आरोग्य मंत्रालय आणि इतर संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीत कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांची माहिती घेतली. यापूर्वी 24 डिसेंबरला पंतप्रधानांनी अशीच बैठक घेतली होती.
Delhi: Prime Minister Narendra Modi chairs a meeting to review the COVID-19 situation in the country, through video conference pic.twitter.com/EY5u7LAaC3
— ANI (@ANI) January 9, 2022
या कोरोना परिस्थितीत पंतप्रधान मोदींनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी कोरोना परिस्थितीचा उच्चस्तरीय आढावा घेतला. ही आढावा बैठक अशा वेळी घेण्यात आली आहे जेव्हा दिल्ली, मुंबई सारख्या मोठ्या महानगरांमध्ये आणि तमिळनाडू, कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये गेल्या 15 दिवसात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकाही जाहीर केल्या आहेत.
दिल्ली, मुंबई, बंगळुरुसह मोठ्या शहरांमधून सर्वाधिक रुग्ण येत आहेत. रविवारी देशात कोरोना विषाणूचे सुमारे 1.6 लाख नवीन रुग्ण आढळले. हा आकडा गेल्या 224 दिवसांतील सर्वाधिक आहे. तर, भारतातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. याशिवाय, रविवारी ओमायक्रॉनचे 552 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या 3,623 झाली आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित या बैठकीत कोविड-19 च्या ताज्या परिस्थितीचा आढावा घेतला.