शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

कोरोनाचा कहर, देशात एकाच दिवसांत आढळले तब्बल 49, 310 रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 12:42 IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवाडीनुसार देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे तब्बल 740 लोकांचा मृत्यू झाला आहे

ठळक मुद्देकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवाडीनुसार देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे तब्बल 740 लोकांचा मृत्यू झाला आहे

नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लॉकडाऊन असतानाही रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. एकाच दिवसात तब्बल 49,310 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंतचा एका दिवसांतील रुग्णावाढीचा हा सर्वात मोठा आकडा आहे. या रुग्णांसह देशातील एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 12 लाख 87 हजार 945 पर्यंत पोहोचली आहे. त्यामध्ये, 8 लाख 17 हजार 208 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवाडीनुसार देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे तब्बल 740 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होऊन आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 30,601 एवढी झाली आहे. सद्यस्थितीत देशात 4 लाख 40 हजार 135 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, आत्तापर्यंत 63.45 टक्के रुग्ण बरो होऊन घरी परतले आहेत. त्यामध्ये विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. 

दरम्यान, राज्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे ५,७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९९ टक्के असून आतापर्यंत एकूण १ लाख ९९ हजार ९६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात शुक्रवारी कोरोनाच्या ९,६१५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४३ हजार ७१४ रुग्णांवर (अ‍ॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली. आतापर्यंत कोरोनापाठविलेल्या १७ लाख ८७ हजार ३०६ नमुन्यांपैकी ३ लाख ५७ हजार ११७ नमुने पॉझिटिव्ह (१९.९८ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८८ हजार ९७६ लोक होम क्वारंटाइन असून ४५ हजार ८३८ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात शुक्रवारी कोरोनामुळे २७८ मृत्यू झाल्याची नोंद झाली असून सध्या मृत्युदर ३.६८ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याNew Delhiनवी दिल्लीonlineऑनलाइन