Omicron: तज्ज्ञांनी सांगितली ओमायक्रॉनची ५ घातक लक्षणं, आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 15:33 IST2022-01-07T14:11:07+5:302022-01-07T15:33:21+5:30

अलीकडेच यूएस सेंटर फॉर डीजीज कंट्रोल अँन्ड प्रिवेंशन एनालिसिसनं ओमायक्रॉनचे ४ सामान्य लक्षणं सांगितली होती. त्यात खोकला, थकवा, कफ आणि सर्दी हे होतं.

Corona: Experts say 5 dangerous symptoms of Omicron, if found, contact a doctor immediately | Omicron: तज्ज्ञांनी सांगितली ओमायक्रॉनची ५ घातक लक्षणं, आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा

Omicron: तज्ज्ञांनी सांगितली ओमायक्रॉनची ५ घातक लक्षणं, आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा

नवी दिल्ली – भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येने वेग पकडला आहे. मागील २४ तासांत कोरोनाचे १ लाख १७ हजार रुग्ण आढळले आहे. गुरुवारी २८ टक्क्यांनी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटनं प्रशासनाची चिंता वाढवली आहे. नव्या व्हेरिएंटचे ३ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनच्या लक्षणांबाबत आरोग्य तज्ज्ञांकडून वेळोवेळी माहिती दिली जात आहे.

अलीकडेच यूएस सेंटर फॉर डीजीज कंट्रोल अँन्ड प्रिवेंशन एनालिसिसनं ओमायक्रॉनचे ४ सामान्य लक्षणं सांगितली होती. त्यात खोकला, थकवा, कफ आणि सर्दी हे होतं. तर आता एम्सने ओमायक्रॉनच्या ५ लक्षणांची यादी तयार करत याकडे दुर्लक्ष करू नका असा इशारा दिला आहे. ही लक्षणं दिसणं म्हणजे तुम्हाला झालेले संक्रमण गंभीर असल्याची चिन्हे आहेत.

ओमायक्रॉनची ५ लक्षणं(5 Symptoms in Omicron)

श्वास घेण्यास अडचण

ऑक्सिजन सॅच्युरेशनमध्ये घट

छातीत वारंवार दबाव आणि वेदना जाणवणे

मेंटल कन्फ्यूजन अथवा काहीही रिएक्ट न करणं

जर ही लक्षणं ३-४ दिवसांपेक्षा अधिक राहिली किंवा आणखी खराब झाली तर..

आरोग्य तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, अचानक त्वचा, ओठ आणि नखांचा रंग बदलत असेल तरी अलर्ट राहण्याची गरज आहे. तज्ज्ञांच्या मते, जर कुणीही व्हायरसच्या संपर्कात येत असेल तर त्याला ५ दिवसांनी लक्षणं दिसल्यास त्वरीत चाचणी करणं गरजेचे आहे. जर कुठलीही लक्षण दिसली तर त्याला क्वारंटाईन तोपर्यंत क्वारंटाईन करावं जोवर त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही.

इलिनॉइस डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ निर्देशक डॉ. नगोजी इजीके म्हणाले की, संक्रमित झाल्यानंतर आणि त्याच्यात लक्षणं दिसल्यानंतर मधल्या काळात बदल होऊ शकतो. परंतु जे लोक लवकर चाचणी करतात त्यांना निगेटिव्ह आल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा चाचणी करायला हवी. जर लक्षण दिसेल तर तातडीने टेस्ट करावी. कोविडची काही अशी लक्षणं आहेत जी घशात खवखवणे, डोकेदुखी, सौम्य ताप, अंगदुखी आहे. जर तुम्ही निगेटिव्ह आला आणि काही दिवसांनी यातील लक्षणं आढळली तरी तुम्हाला कोविड टेस्ट करावी लागेल.

कसे रुग्ण होम आयसोलेटेड होणार?

डॉक्टरांच्या परवानगीने एसिम्पटोमेटिक अथवा सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना होम क्वारंटाईन केले जाईल.

ज्या रुग्णांना घरी क्वारंटाईन करण्यात येईल. त्यांच्या घरी रुग्णासोबत त्याच्या संपर्कात आलेले कुटुंबाचीही क्वारंटाईन करण्याची व्यवस्था आहे.

रुग्णाच्या देखभालीसाठी एक व्यक्ती २४ तास राहायला हवा. देखभाल करणारा आणि डॉक्टर एकमेकांच्या संपर्कात राहतील जोवर रुग्णाचा क्वारंटाईन कालावधी संपुष्टात येत नाही.

कंट्रोल रुमचा नंबर कुटुंबाकडे असेल आणि वेळोवेळी ते क्वारंटाईन रुग्णांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देतील.

 

Web Title: Corona: Experts say 5 dangerous symptoms of Omicron, if found, contact a doctor immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.