शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

कोरोना इफेक्ट : आंतरराष्ट्रीय प्रवास झाला स्वस्त; २५६ सीटच्या विमानात केवळ २५ प्रवासी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 2:44 AM

Corona Virus: कोरोनाच्या प्रसारानंतर आंतरराष्ट्रीय विमानांसाठी ही विलक्षण परिस्थिती निर्माण झाली आहे. तिकिटाचे दर एवढे कमी करूनही परिस्थितीत सुधारणा नाही.

मुंबई : मुंबई ते लंडन आणि रिटर्नचे विमानाचे तिकीट केवळ ४६०००? ही काही कल्पना नाही, तर वस्तुस्थिती आहे. ऑनलाईन सर्चमध्ये शुक्रवारी ही आकडेवारी दिसत होती. तुर्कीश एअरलाईनचे विमान इस्तांबूलमध्ये ७५ मिनिटांसाठी थांबले होते तेव्हा या एअरलाइन्सने ही ऑफर दिली होती. मार्चमध्ये मुंबई ते लंडन आणि रिटर्नचे नेहमीचे तिकीट ८० हजार रुपये आहे.

आपण दिल्ली ते न्यूयॉर्कचे तिकीट बुक करून दोन दिवसांत होळीसाठी पुन्हा भारतात परतू शकता आणि तेही केवळ ५८ हजार रुपयांत. एरव्ही याच मार्गासाठी हे भाडे ८० हजार रुपये आहे.

कोरोनाच्या प्रसारानंतर आंतरराष्ट्रीय विमानांसाठी ही विलक्षण परिस्थिती निर्माण झाली आहे. तिकिटाचे दर एवढे कमी करूनही परिस्थितीत सुधारणा नाही. या आठवड्यात एका विमानाने सिंगापूरसाठी उड्डाण केले तेव्हा २५६ सीटच्या या विमानात केवळ २५ प्रवासी होते. हीच परिस्थिती लंडन-मुंबई या विमानात होती. मुंबईत लँड झालेल्या या विमानात केवळ ६० प्रवासी होते. ९/११ नंतरच्या हल्ल्यानंतर गत दोन दशकांत प्रथमच आंतरराष्ट्रीय विमानांसाठी ही परिस्थिती ओढावली आहे. पूर्व आशियातील प्रवासाशिवाय पश्चिम आशियात म्हणजे दुबई आणि अबुधाबीसाठीही हा फटका बसला आहे. मुंबई आणि दिल्लीतील निवासी दुबई आणि अबुधाबीसाठी विकएंडचे रिटर्न तिकिट केवळ १२,२०० मध्ये घेऊ शकतात. मुंबईतून पॅरिससाठी ४० हजार, इस्तांबूलसाठी ४२ हजार, बहरीन ५९ हजार रुपये आकारण्यात येत आहेत.इंडिगोने रिशेड्युलिंग शुल्क केले माफकोरोनामुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीनंतर ‘इंडिगो’ने ३१ मार्चपर्यंतच्या बुकींगवरील रिशेड्युलिंग शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे. तथापि, कॅन्सलेशन शुल्क मात्र कायम राहणार आहे.इंडिगोचे मुख्य वाणिज्य अधिकारी विलियम बोल्टर यांनी सांगितले की, काही प्रवाशांना सध्याच्या परिस्थितीतही प्रवास करावा लागत आहे, हे आम्ही समजू शकतो. आपली चिंता दूर करण्यासाठी आणि आपला प्रवास त्रासमुक्त करण्यासाठी आम्ही आगामी दोन आठवडे नॉर्मल चेंज फी माफ करत आहोत. तथापि, नंतरच्या तारखेत रिशेड्युलिंग केल्यास भाडेदरातील फरक मात्र प्रवाशांना नियमानुसार द्यावा लागेल. प्रवाशांनी तीन दिवस अगोदर एअरलाइनला सूचना करायला हवी.

टॅग्स :corona virusकोरोना