शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातील रेल्वे स्थानकं, मंदिरं उडवण्याची धमकी; हाय अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 16:34 IST

धमकीनंतर सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना 

लखनऊ: लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेनं उत्तर प्रदेशातील अनेक रेल्वे स्थानकांसह कृष्ण जन्मभूमी आणि काशी विश्वनाथ मंदिरांमध्ये स्फोट घडवण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. याशिवाय पोलिसांनी राज्यात हाय अलर्टदेखील जारी केला आहे. उत्तर प्रदेश पोलीस महासंचालकांनी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. एका पत्राद्वारे पोलीस महासंचालकांनी हे आदेश दिले आहेत. लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू शेखनं एका पत्राद्वारे उत्तर प्रदेशच्या सहारनपूर, हापूडसह अनेक रेल्वे स्थानकांवर बॉम्ब स्फोट घडवण्याची धमकी दिली असल्याचा उल्लेख महासंचालकांनी पोलिसांना पाठवलेल्या पत्रात आहे. यासोबतच मथुरामधील कृष्ण जन्मभूमी आणि बनारसमधील काशी विश्वनाथ मंदिर उडवण्याची धमकीही देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लष्कर-ए-तोयबाकडून धमकीचं पत्र मिळालं. दहशतवादी संघटनेचा कमांडर मौलाना अबू शेखनं हे पत्र पाठवलं आहे. 6 ते 10 जून या कालावधीत राज्यातील रेल्वे स्थानकं आणि मंदिरांमध्ये स्फोट घडवू, अशी धमकी यामधून देण्यात आली आहे. यानंतर सहारनपूर, हापूडसह अनेक रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याशिवाय कृष्ण जन्मभूमी आणि काशी विश्वनाथ मंदिराजवळील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणांवर अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबाTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद