शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जात-धर्म पाहून पोलीस काम करत नाहीत, केवळ टीका करणं अयोग्य - अमित शाह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 16:10 IST

'पोलिसांचे काम समजून घेतले पाहिजे'

नवी दिल्ली : नागरिकांना पोलिसांचा सन्मान करण्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी केले आहे. दिल्लीपोलिसांच्या आयोजित 73 व्या रेजिंग डे परेडमध्ये अमित शाह बोलत होते. यावेळी पोलीस आपल्या सुरक्षेसाठी आहेत म्हणून आपण त्यांच्यावर फक्त टीका किंवा गुंडांसारखे त्यांना लक्ष्य करणे चांगले नाही. पोलिसांचे काम समजून घेतले पाहिजे, असे अमित शाह यांनी सांगितले. 

शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस कोणताही धर्म किंवा जात पाहून करत नाहीत. आवश्यकतेनुसार पोलीस मदत करतात. पोलीस कोणाचेही शत्रू नाहीत, तर पोलीस शांतता आणि सुव्यवस्थेचे मित्र आहेत. त्यामुळे पोलिसांचा सतत सन्मान केला पाहिजे, असे अमित शाह म्हणाले.

आपल्यासाठी अनेक उत्सव असतात. मात्र, पोलिसांसाठी प्रत्येक उत्सव हा त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी असते. अशा जबाबदाऱ्यासोबत ते आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यांच्याप्रती देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आदर असला पाहिजे, असे अमित शाह म्हणाले.

याशिवाय, दिल्ली पोलिसांनी अनेक स्मार्ट योजना राबविल्या आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी निर्भया फंड अंतर्गत डायल 112 आणि नॅशनल सायबर फॉरेन्सिक लॅबची स्थापना केली आहे. पंतप्रधान मोदींनी 35,000 जवान आणि पोलिसांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय पोलीस मेमोरियलची स्थापना केली आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.

याचबरोबर, देशाच्या स्वातंत्र्यानंतर 35,000हून अधिक पोलीस कर्मचार्‍यांनी देशाचे रक्षण व देशातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्ली पोलिसांची सुरुवात केली ही अभिमानाची बाब आहे, असेही अमित शाह म्हणाले.

आणखी बातम्या

अनैसर्गिक महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही - जे. पी. नड्डा

महायुतीच सरकार येईल असे वाटत असताना विश्वासघात झाला: चंद्रकांत पाटील

केजरीवालांच्या नव्या कॅबिनेटमध्ये बदल नाही; जुन्याच मंत्र्यांनी घेतली शपथ

'मासिक पाळीची बातमी डोनाल्ड ट्रम्पपर्यंत पोहोचू नये म्हणून कोणती नवी भिंत उभारणार?'

बाप रे! संपूर्ण दिल्ली देशद्रोही; सामनातून भाजपवर टीकास्त्र

 

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाdelhiदिल्लीPoliceपोलिस