शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
3
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
4
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
5
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
6
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
7
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
8
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
9
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
10
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
11
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
12
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
13
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
14
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
15
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
16
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
17
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
18
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
19
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
20
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?

बोंबला! लग्नात जेवण बनवणारा आचारीच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, लग्न घरात एकच गोंधळ...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 12:28 PM

अनेक शहरांमधून लग्नाच्या बातम्या येत आहेत. दरम्यान एका लग्नाची एक चिंताजनक बाब समोर आली आहे.

कोरोनाचं थैमान अजूनही सुरूच आहे. आता तर लॉकडाऊनमधील काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोक बाहेर पडत आहेत आणि त्यामुळे कोरोनाचे रूग्णही दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा लग्नांना सुरूवात झाली आहे.

अनेक शहरांमधून लग्नाच्या बातम्या येत आहेत. दरम्यान एका लग्नाची एक चिंताजनक बाब समोर आली आहे. एका लग्नातील जेवण तयार करणाऱ्या आचाऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने अनेकांची चिंता वाढली आहे.

AajTak ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना आहे मध्य प्रदेशातील छतरपूरची. येथील ग्राम पंचायत बंधामध्ये झालेल्या एका लग्नात जी व्यक्ती जेवण तयार करण्यासाठी आली होती ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होती. आधी याबाबत कुणालाच माहिती नव्हती. ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितल्यावर लग्न घरात एकच गोंधळ उडाला.

तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचायत समितीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आचाऱ्याला जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या वधू-वरासहीत 86 लोकांची थर्मल स्क्रीनिंग सुरू केली.

स्क्रीनिंगनंतर सर्वांनाच होम क्वारंटाइन केलं असून त्यांना सरकारी शाळेत ठेवण्यात आलं आहे. सोबत याच आरोग्य विभागाच्या टीमने सगळी व्यवस्था बघत लग्न समारंभही संपन्न केला.

इतकेच नाही तर प्रशासनाने वर-वधूसहीत इतर लोकांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन केलंय. तसेच ज्या परिसरात लग्न होतं त्या परिसराला कन्टेमेंट झोन घोषित केलंय.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न