शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’वरून वाद, अनुपम खेर व मेहतांची एकमेकांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 08:16 IST

मनमोहन सिंगांच्या निधनामुळे ज्येष्ठ पत्रकार वीर सांघवी यांनी एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट करत २०१९ साली प्रदर्शित झालेला पॉलिटिकल ड्रामा चित्रपट ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ यात माजी पंतप्रधानांबद्दल खोटी माहिती दिल्याचा दावा केला होता. त्यानंतर मेहतांनी ही पोस्ट शेअर करत मी शंभर टक्के सहमत असल्याचे नमूद केले.

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या चित्रपटासंदर्भात एका पत्रकाराने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवर चित्रपट निर्माते हन्सल मेहता यांनी सहमती दर्शवल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. त्यानंतर चित्रपट अभिनेता अनुपम खेर व हन्सल मेहता यांनी एकमेकांना लक्ष्य केले.

मनमोहन सिंगांच्या निधनामुळे ज्येष्ठ पत्रकार वीर सांघवी यांनी एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट करत २०१९ साली प्रदर्शित झालेला पॉलिटिकल ड्रामा चित्रपट ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ यात माजी पंतप्रधानांबद्दल खोटी माहिती दिल्याचा दावा केला होता. त्यानंतर मेहतांनी ही पोस्ट शेअर करत मी शंभर टक्के सहमत असल्याचे नमूद केले. ही पोस्ट शेअर करण्यापूर्वी मेहतांनी आणखी एक पोस्ट करत सिंगांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत देशाने त्यांची माफी मागायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. इतरांपेक्षा मी त्यांचा जास्त ऋणी आहे. मजबुरी किंवा हेतू काहीही असो, खंत वाटते, असे म्हणत मेहतांनी सिंग यांची माफी मागितली. मात्र, मेहतांनी सांघवींच्या पोस्टचे समर्थन केल्याने खेर नाराज झाले आहेत. त्यांनी मेहता ढोंगी असल्याचा आरोप केला आहे. 

खेर यांचे म्हणणे काय?-  मेहतांनी या चित्रपटासाठी ‘क्रिएटिव्ह डायरेक्टर’ म्हणून काम केले आहे. या सर्व प्रकरणात वीर सांघवी ढोंगी नाहीत. त्यांना चित्रपटाबद्दल नापसंती व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. -  मात्र, हन्सल मेहता  ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’चे ‘क्रिएटिव्ह डायरेक्टर’ होते. इंग्लंडमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना ते उपस्थित होते. -  या चित्रपटासाठी त्यांनी दिलेल्या सर्जनशील माहितीची त्यांना फी मिळाली आहे. त्यामुळे सांघवींच्या वक्तव्याबद्दल १०० टक्के सहमती दर्शवणे हे दुटप्पीपणाचे लक्षण असल्याचे नमूद करत खेर यांनी मेहतांवर टीकेची झोड उठवली. 

टॅग्स :Anupam Kherअनुपम खेरManmohan Singhडॉ. मनमोहन सिंगbollywoodबॉलिवूड