शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

देशातील आणखी एका प्रमुख राजकीय पक्षात वाद, बहिणीने भावावर केले असे आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:19 IST

BRS News: देशातील आणखी एका प्रमुख राजकीय पक्षामध्ये वादाला तोंड फुटण्याचे संकेत मिळत आहेत. तेलंगाणाचे पहिले मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षामध्ये सुरू असलेली अंतर्गत कुरबूर आता उघडपणे समोर येऊ लागली आहे.

देशातील आणखी एका प्रमुख राजकीय पक्षामध्ये वादाला तोंड फुटण्याचे संकेत मिळत आहेत. तेलंगाणाचे पहिले मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षामध्ये सुरू असलेली अंतर्गत कुरबूर आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. पक्षाच्या नेत्या आणि माजी खासदार आणि के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी बीआरएसमधील काही नेते पक्षाचं भाजपामध्ये विलिनीकरण करण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला  आहे. मी तुरुंगात असताना या गोष्टीला विरोध केला होता. तसेच पक्षाला वाचवण्यासाठी आणखी एक वर्षभर तुरुंगात राहण्यास तयार होते, असेही त्यांनी सांगितले.

के. कविता यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांचा भाऊ आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के.टी. रामाराव यांना लक्ष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, के.टी. रामाराव हे पक्षांतर्गत गद्दारांवर कुठलीही कारवाई करत नाही आहेत. तसेच काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला उत्तरही देत नाही आहेत. कविता यांनी पुढे सांगितले की, पक्षामध्ये मला एकटं पाडण्यासाठी आणि वडील के. चंद्रशेखर राव यांच्यासोबत असलेलं नातं कमकुवत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

कविता पुढे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी वडील के. चंद्रशेखर राव यांना एक पत्र लिहिलं होतं. मात्र माझी बदनामी करण्यासाठी हे पत्र पक्षातीलच काही नेत्यांनी फोडलं. हे पत्र फोडणाऱ्यांवर करणाऱ्यांवर पक्षाच्या नेतृत्वाने आतापर्यंत कुठलीही कारवाई का केली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एवढंच नाही तर हे पत्र फोडणाऱ्यांनी सोशल मीडिया ट्रोल्स आणि परदेशी माध्यमांचाही माझ्या बदनामीसाठी उपयोग करून घेतला.

दरम्यान, के. कविता यांनी केलेल्या आरोपांनंतर भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसमध्ये पक्षाच्या उत्तराधिकाऱ्यावरून संघर्ष तीव्र झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. के. चंद्रशेखर राव अद्याप राजकारणात सक्रिय आहेत. मात्र पक्षात दोन गट तयार झाले असून, एका गटामध्ये केटीआर यांचे समर्थक आणि दुसऱ्या गटात कविता यांचे समर्थक आहेत.  

टॅग्स :TelanganaतेलंगणाBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती